शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

२७८ केंद्रांवर आज शिष्यवृत्ती परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 16:46 IST

नाशिक : महाराष्टÑ राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून घेण्यात येणारी शिष्यवृत्ती परीक्षा रविवार दि. २४ रोजी घेतली जाणार आहे. शहर ...

ठळक मुद्देजिल्ह्यातील ४५ हजार विद्यार्थी देणार परीक्षा

नाशिक: महाराष्टÑ राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून घेण्यात येणारी शिष्यवृत्ती परीक्षा रविवार दि. २४ रोजी घेतली जाणार आहे. शहर आणि जिल्ह्यातील २७८ केंद्रांवर सदर परीक्षा होणार असून या परीक्षेसाठी एकुण ४५ हजार ३२७ विद्यार्थी बसले आहेत. या परीक्षेचे संपुर्ण नियोजन पुर्ण करण्यात आले असून विद्यार्थ्यांपर्यंत त्यांचे आसनक्रमांक पोहचविण्यात आले आहे.पुणे येथील परीक्षा परिषदेच्यावतीने आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सदर परीक्षा घेतली जाणार आहे. नाशिक जिल्ह्यातून पुर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती (पाचवी) आणि पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (आठवी) च्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा जिल्ह्यातील २७८ केंद्रांवर होणार असून पर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा १२२ केंद्रांवर १९,२३८ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. त्यासाठी ९५४ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती (पाचवी) साठी २६ हजार ८९ विद्यार्थी परीक्षा देणार असून १५६ केंद्रांवर परीक्षा घेतली जाणार आहे.पहिला पेपर हा दुपरी १ ते २.३०, पेपर क्रमांक २ हा दुपारी ३.३० ते सायंकाळी पाच या वेळेत होणार आहे. सकाळच्या पहिल्या सत्रात प्रथम भाषा आणि गणिताची परीक्षा होणार आहे. दुपारच्या सत्रात तृतीय भाषा आणि बुद्धीमत्ता चाचणी परीक्षा होणार आहे. ३०० गुणांची ही परीक्षा असून ७५-७५ गुणांचे दोन पेपर्स असे परीक्षेचे स्वरूप आहे. परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी पत्येक केंद्रांवर एक या प्रमाणे २७८ केंद्रसंचालकांची नियुक्ती करण्यात आली आहे. आबजेक्टीव टाईप ही परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांना परीक्षेनंतर उत्तरपत्रिकेची कार्बनप्रिंट मिळणार आहे. स्पर्धा परीक्षेप्रमाणेच विद्यार्थ्याला यामुळे आपल्या गुणांची पडताळणी करणे सोपे होणार आहे. यातून या परीक्षेत अधिक पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.सदर शिष्यवृत्ती परीक्षा मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू आणि गुजराथी या चार भाषांमध्ये होणार आहे. जिल्ह्यात जिल्हाधिकारी, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागाचे तीन भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. तर तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथके परीक्षेवर नजर ठेऊन असणार आहेत.विशेष म्हणजे यंदा विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेवर हाताने आसनक्रमांक लिहावा लागणार नाही तर तरो उत्तरपत्रिकेवर प्रिंटेड असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्याला उत्तरपत्रिका भरण्यासाठी लागणारा वेळ देखील वाचणार आहे. स्वाक्षरी पट देखील छापील असल्यामुळे यावर विद्यार्थ्यांना केवळ सही करावी लागणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिकnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद