शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटीची साडेतीनशे कोटींची कामे सुरू करण्यासाठी चाचपणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 15:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : लॉकडाउन आणि संचारबंदीमुळे महापालिकेची कोट्यवधी रुपयांची कामे रखडली होती. त्यातील सुमारे शंभर कोटी रुपयांची ...

ठळक मुद्देलॉकडाउन : महापालिकेपाठोपाठ कंपनीची कामे सुरू होण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : लॉकडाउन आणि संचारबंदीमुळे महापालिकेची कोट्यवधी रुपयांची कामे रखडली होती. त्यातील सुमारे शंभर कोटी रुपयांची कामे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता स्मार्ट सिटी कंपनीच्या रखडलेल्या साडेतीनशे कोटी रुपयांच्या कामांचा शुभारंभ करण्याबाबतदेखील हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे गावठाण विकास आणि प्रोजेक्ट गोदाची कामे लवकरच सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.गेल्या महिन्यात केंद्र शासन आणि राज्य शासनाने लॉकडाउन आणि संचारबंदी लागू केली. त्यामुळे खासगी आणि शासकीय अशी सर्वच कामे थांबली आहेत. नाशिक महापाालिकेच्या कोट्यवधी रुपयाची कामे रखडली आहेत. किमान सातशे ते आठशे कोटी रुपयांची कामे थांबल्याने महापालिकेला भविष्यात मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तथापि, २० एप्रिलनंतर राज्य शासनाने काही उद्योग आणि व्यवसायाबाबत शिथिलता दिल्यानंतर महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी काही कामे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण विभागाची सुमारे शंभर कोटी रुपयांची कामे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय पावसाळापूर्व गटारी साफ करणे आणि अन्य कामे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर टप्प्याटप्प्याने अन्य कामे सुरू करण्यात येणार आहेत. याच धर्तीवर स्मार्ट सिटी कंपनीची रखडलेली सुमारे साडेतीनशे कोटी रुपयांची कामेदेखील सुरू होण्याची शक्यता आहे. स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने गावठाण विकासाची २४१ कोटी रुपये, तर प्रोजेक्ट गोदाच्या पहिल्या टप्प्यातील ११० कोटी आणि गोदावरी रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंटची दहा कोटी अशी सुमारे ३६० कोटी रुपयांची कामे रखडलीआहेत. यातील प्रोजक्ट गोदा आणि आणि गावठाण विकासाअंतर्गत रस्त्याची कामे सुरूदेखील झाली होती. मात्र ही कामे बंद पडली होती. आता महापालिका लवकरच ही कामे सुरू करण्याची शक्यता आहे.

टॅग्स :NashikनाशिकSmart Cityस्मार्ट सिटी