शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक जिल्हा परिषद बदल्यांमध्ये ६९ शिक्षक आढळले दोषी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 23:29 IST

नाशिक : जिल्हा परिषदेच्या आॅनलाइन शिक्षक बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ झाल्याचे समोर आल्यानंतर जिल्हा परिषदेने याप्रकरणी केलेल्या सुनावणीत पहिल्या टप्प्यात ६९ शिक्षक दोषी आढळल्याने या शिक्षकांची एक वेतनवाढ कायमस्वरूपी बंद करण्याच्या आदेशावर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी स्वाक्षरी केली.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : १४ शिक्षकांमध्ये होणार अंतर्गत बदल६९ पैकी १४ जागांवर अंतर्गत बदल होणार

नाशिक : जिल्हा परिषदेच्या आॅनलाइन शिक्षक बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ झाल्याचे समोर आल्यानंतर जिल्हा परिषदेने याप्रकरणी केलेल्या सुनावणीत पहिल्या टप्प्यात ६९ शिक्षक दोषी आढळल्याने या शिक्षकांची एक वेतनवाढ कायमस्वरूपी बंद करण्याच्या आदेशावर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी स्वाक्षरी केली. दरम्यान, संबंधित शिक्षकांनी खोटी माहिती भरल्यामुळे अवघ्या १४ शिक्षकांवरच अन्याय झाल्याने त्यांच्यात अंतर्गत बदल करण्यात येणार आहे. या १४ शिक्षकांना त्यांच्या आॅप्शननुसार आता नव्याने पदस्थापना मिळणार आहे.जिल्हा परिषदेच्या बहुचर्चित आॅनलाइन बदली प्रकरणात अनेक शिक्षकांनी चुकीची माहिती भरल्यामुळे सुमारे दीडशे शिक्षक विस्थापित झाल्याचा दावा करण्यात आला होता. त्यामुळे बदली झालेल्या आणि न झालेल्या शिक्षकांनी चुकीची आणि संशयास्पद माहिती भरलेल्या शिक्षकांची जिल्हा परिषदेकडे तक्रार नोंदविली होती. संवर्ग-१ आणि संवर्ग-२ मध्ये शिक्षकांनी शासनाची दिशाभूल करणारी माहिती भरून सोयीच्या बदल्या पदरात पाडून घेतल्याने बदलीपात्र शिक्षकांवर यामुळे अन्याय झाल्याची मोठी तक्रार झाली होती. प्रत्येक तालुक्यातून तक्रार प्राप्त झाल्याने जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या समक्ष गेल्या आठवडाभरापासून शिक्षकांची सुनावणी सुरू होती. यासाठी वैद्यकीय प्रतिनिधी, अभियंता आणि गटशिक्षण, शिक्षणाधिकारी यांच्या समक्ष सुनावणी होऊन याप्रकरणी निर्णय घेण्यात आल्याचे गिते यांनी सांगितले.चुकीची माहिती भरल्यामुळे दोषी आढळलेल्या ६९ शिक्षकांवर कारवाई होणार असून, त्यांची एक वेतनवाढ कायमस्वरूपी बंद करण्याच्या आदेशावर मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी स्वाक्षरी केली आहे. दोषी आढळलेल्या ६९ शिक्षकांपैकी केवळ १४ शिक्षकांवरच बदलीत अन्याय झाल्याचे चौकशीत समोर आल्याने या १४ शिक्षकांमध्ये इंटरचेंज केले जाणार आहेत. याचाच अर्थ ६९ पैकी १४ जागांवर अंतर्गत बदल होणार असून, यामुळे अन्याय झालेल्या संबंधित १४ शिक्षकांना काहीसा दिलासा मिळणार आहे.दरम्यान, दोषी आढळलेल्या शिक्षकांवर वेतनवाढ रोखण्याची कारवाई करण्यात आली असली तरी संबंधित शिक्षक हे पुढीलवर्षीच्या बदलीप्रक्रियेसाठी पात्र असणार आहेत; मात्र त्यांच्यावर शासनाच्या आदेशाप्रमाणे कारवाई केली जाणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिकnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद