शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

एस.टी. बस तिकिटांच्या अपहाराचा संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 18:56 IST

नाशिक : राज्य परिवहन महामंडळाचे आधुनिकीकरण होत असताना अनेक प्रकारच्या त्रुटीदेखील अनेकदा समोर आलेल्या आहेत. महामंडळाच्या ताफ्यात खासगी शिवशाही ...

ठळक मुद्देमहामंडळाकडून चौकशी : तक्रारींची संख्या तीन हजारांपर्यंत

नाशिक : राज्य परिवहन महामंडळाचे आधुनिकीकरण होत असताना अनेक प्रकारच्या त्रुटीदेखील अनेकदा समोर आलेल्या आहेत. महामंडळाच्या ताफ्यात खासगी शिवशाही बसेस दाखल झाल्यानंतर सतत चर्चेत राहणारे महामंडळ आता राज्यातील डेपो स्तरावरील गैरकारभार आणि तिकिटातील गैरप्रकारामुळे पुन्हा लोकप्रतिनिधींच्या रडारवर आले आहे.राज्य परिवहन महामंडळाने अनेक बदलांच्या घोषणा आणि उपाययोजना करण्याबरोबरच मदतीसाठीचे महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत. मात्र त्यांच्या या घोषणांमुळे त्यांना टीकेलाच अधिक सामोरे जावे लागले आहे. सफाई व्यवस्थेचे कंत्राट असो की शिवशाही बसेसचे अपघात, कोट्यवधींची मदत, तिकिटाचे खासगीकरण आणि अपघातांविषयी लोकप्रतिनिधींनी तारांकित प्रश्न उपस्थित केले असताना आता तिकिटातील अपहारावरदेखील तारांकित प्रश्न विचारण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.राज्यातील अनेक आमदारांनी महामंडळातील तिकीट अपहाराबाबत महामंडळाकडे विचारणा केलेली आहे. राज्य परिवहन महामंडळातील वाहकांकडून तिकिटाचा अपहार होत असल्याची सुमारे २९,००० प्रकरणे एप्रिल महिन्यापर्यंत दाखल झाली आहेत. अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात अपहाराची प्रकरणे दाखल झाल्यामुळे महामंडळाचे उत्पन्न बुडल्याचादेखील प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. महामंडळाचे उत्पन्न जर अशा प्रकरणांमुळे कमी होणार असेल तर या गैरप्रकाराविषयी राज्यातील व्याप्ती मोठी असू शकते. त्या अनुषंगाने संपूर्ण राज्यातील आगार प्रमुखांकडून तिकीट अपहाराच्या प्रकरणांची माहिती मागविण्यात आलेली आहे.संबंधित प्रकरणी तारांकित प्रश्न उपस्थित झाल्यामुळे सर्व आगारांनी १५ एप्रिल रोजीची अपहाराची प्रलंबित प्रकरणे किती? वाहकांची एकूण प्रलंबित प्रकरणे किती? मे अखेरपर्यंत एकूण अपहाराच्या प्रकरणांची माहितीदेखील मागविण्यात आलेली आहे. राज्यातील राज्य परिवहन महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक, विभाग नियंत्रक यांच्याकडून संपूर्ण माहितीचा तपशील मागविण्यात आलेला आहे.

टॅग्स :NashikनाशिकPublic Transportसार्वजनिक वाहतूक