शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभा निवडणूक तयारीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 18:02 IST

बॅँगलोरवरून येणार साहित्य : मतदान यंत्राच्या बॅटऱ्या दाखल नाशिक : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी नाशिक जिल्ह्याने तयारीत आघाडी घेतली असून ...

बॅँगलोरवरून येणार साहित्य : मतदान यंत्राच्या बॅटऱ्या दाखलनाशिक: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी नाशिक जिल्ह्याने तयारीत आघाडी घेतली असून मतदानप्रक्रियेसाठी लागणारे कागद आणि मशीन्सच्या बॅटºया बॅँगलोर येथून दाखल झाल्या आहेत. दुसरी महत्वाची बाब म्हणजे राजकीय पक्ष कार्यालयांमध्ये मतदारयाद्या पोहचविण्याचे काम देखील सुरू झाले आहे.विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक शाखेकडून करण्यात आलेल्या नियोजनाच्या माध्यमातून निवडणुकीच्या कामाला चांगलीच गती आली आहे. मतदारयाद्यांच्या शुद्धीकरणासाठी राबविण्यात आलेल्या मोहिमेमुळे संपुर्ण वातावरण ढवळून निघाले असून सर्वसामान्य नागरिक मतदानाच्या कामात गुंतल्याचे दिसते. विद्यार्थ्यांचा देखील सहभाग वाढल्यामुळे एकुणच जिल्ह्यातील निवडणूक तयारीच्या कामाला कमालीचा वेग आल्याचे दिसते. काही दिवसांपूर्वीच जिल्हा निवडणूक शाखेने राज्य निवडणूक आयोगाकडे संभाव्य यंत्रांची मागणी नोंदविली अूसन त्यानुसार बॅँगलोर येथून काही साहित्य दाखल देखील झाले असून लवकरच अन्य मशीन्स आणि साहित्य देखील दाखल होणार आहे.निवडणूक शाखेने आयोगाकडे यापूर्वीच दहा हजार बॅलेट युनिट, सहा हजार व्हीव्हीपॅट व सहा हजार कंट्रोल युनिटची मागणी नोंदविली आहे. जिल्ह्यातील पंधरा मतदारसंघात सुमारे ४४ लाख इतकी मतदारांची संख्या असून, निवडणूक प्रकिया सुरळित पार पाडण्यासाठी निवडणूक शाखेने विशेष खबरदारी घेतली आहे. येत्या १५ सप्टेंबरला राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे.

 

 

 

 

टॅग्स :NashikनाशिकElectionनिवडणूक