शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

जातीच्या नावाखाली भाषणबाजी चुकीची : पंकजा मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 22:13 IST

नाशिक : देशात अलीकडे रोजच जातीच्या नावाखाली काही विरोधकांकडून भाषणबाजी केली जात आहे. राजकारण करताना जातीधर्माचा आधार घेतला जात असल्याचा आरोप करीत ही बाब अत्यंत चुकीची असल्याचे राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.अस्मिता महिला मेळाव्यासाठी नाशिकमध्ये आलेल्या पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपोेषणाचे ...

ठळक मुद्देराज्यातील महिलांवरील अत्याचाराचा मुद्दा अत्यंत गंभीरजातीधर्माच्या आधारावर विधाने करून तेढ

नाशिक : देशात अलीकडे रोजच जातीच्या नावाखाली काही विरोधकांकडून भाषणबाजी केली जात आहे. राजकारण करताना जातीधर्माचा आधार घेतला जात असल्याचा आरोप करीत ही बाब अत्यंत चुकीची असल्याचे राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.अस्मिता महिला मेळाव्यासाठी नाशिकमध्ये आलेल्या पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपोेषणाचे समर्थन करताना विरोधक संसदेचे कामकाज चालवू देत नसल्यामुळे मोदी यांनी क्लेष व्यक्त करण्यासाठी उपोषण सुरू केले असल्याचे सांगितले. लोकप्रतिनिधी म्हणून जनतेने निवडून दिले असल्यामुळे विरोधकांनी जनहितासाठी सभागृह चालविणे अपेक्षित आहे. परंतु विरोधक जातीधर्माच्या आधारावर विधाने करून तेढ वाढवत असून, हे वेदनादायी असल्याचा आरोप पंकजा मुंडे यांनी केला. दररोज कुठे ना कठे जातीवादावर प्रतिक्रिया किंवा भाषणे दिली जात असल्याचे मुंडे यांनी सांगितले.राज्यातील महिलांवरील अत्याचाराचा मुद्दा अत्यंत गंभीर आहे. याप्रकरणी पोलीस आणि समाजानेदेखील आपली भूमिका पार पाडली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. धनंजय मुंडे यांना पुरस्कार मिळाल्याने मी त्यांचे अभिनंद केले, असा पुरस्कार राष्टÑवादीच्या अन्य कुणालाही मिळाला असता तरी मी त्यांचे अभिनंदन केलेच असते. राजकारण हे केवळ व्यासपीठापुरते मर्यादित असते. अन्यवेळी आम्हीही माणसंच आहोत असे सांगून त्यांनी आपली भावना व्यक्त केली. भगवानबाबांच्या गादीवर बसलेले नामदेव शास्त्री आदरणीयच असल्यामुळे त्यांचा आशीर्वाद यापूर्वीही घेत आले आहे, येथून पुढेही घेणारच, असेही मुंडे म्हणाल्या. प्रशासकीय इमारती असल्या पाहिजे ही सरकारची भूमिका असल्याचे मुंडे यांनी यावेळी सांगितले.

 

टॅग्स :Nashikनाशिकwomen and child developmentमहिला आणि बालविकास