शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीनिमित्ताने शिवशाही बसेस फुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2019 19:38 IST

नाशिक : पाडवा आणि भाऊबीजनिमित्ताने बसेसला प्रवाशांची गर्दी वाढत असल्याने महामंडळाने विभागातून जादा बसेसेचे नियोजन केले आहे. महामार्ग तसेच ...

ठळक मुद्देजादा बसेस धावणार : अधिकारी ‘नॉट रिचेबल’ असल्याने नियोजन कोलमडणार

नाशिक : पाडवा आणि भाऊबीजनिमित्ताने बसेसला प्रवाशांची गर्दी वाढत असल्याने महामंडळाने विभागातून जादा बसेसेचे नियोजन केले आहे. महामार्ग तसेच नवीस सीबीएस स्थानकातून जास्तीत जास्त बसेस सोडण्यात आलेल्या असल्या तरी नियोजनाच्या कोणत्याही सूचना नसल्यामुळे स्थानकावरील कर्मचाऱ्यांच्या भरवशावरच प्रवाशांची वाहतूक करावी लागणार आहे. दरम्यान, शिवशाही बसेसला बुकिंग असल्यामुळे थेट येणाºया प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागत आहे.दिवाळीत प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे महामंडळाच्या उत्पन्नात वाढ होत असते. महामंडळाला उत्पन्न मिळवून देणाºया या सणानिमित्ताने दरवर्षी जादा बससेचे नियोजन केले जाते. त्यानुसार जुने सीबीएससह नवीन सीबीएस आणि महामार्ग बससस्थानकातून बसेस सोडण्यात आलेल्या आहेत. महामंडळाने लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी शक्यता शिवशाही बसेस सुरू केलेल्या आहेत. नाशिक-पुणे, नाशिक-मुंबई, नाशिक- औरंगाबाद, नाशिक-कोल्हापूर आदी मार्गांवर सुरू असलेल्या शिवशाही बसेसचे मोठ्या प्रमाणात बुकिंग करण्यात आल्यामुळे अन्य प्रवाशांसाठी जागादेखील उपलब्ध होत नसल्याची तक्रार आहे. बस समोरून आली तरी बुकिंगमुळे अन्य प्रवाशांना थांबावे लागते. त्यातून प्रवासाला विलंब होत असल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी आहेत. विशेष म्हणजे शिवशाहीचे बुकिंग करूनही निर्धारित वेळेत बसेस धावत नसल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.महामार्ग तसेच नवीस सीबीएस बसस्थानकात होणारी गर्दी लक्षात घेऊन येथे नियोजन करण्यात आले आहे. स्थानकावर अतिरिक्त कर्मचरी काम करणार असून, ते प्रवाशांना बसेसने प्रवास करण्यासाठी मदत करणार आहेत. वारंवार ध्वनिक्षेपकावरून सूचना देण्यात येणार आहेत, तर चालक-वाहकांनादेखील प्रवाशांशी सौजन्याने वागण्याची सूचना देण्यात आलेल्या आहेत.-आंदोलनाचा धास्ती---कामगार संघटनेने सुरू केलेल्या आंदोलनामुळे प्रशासनाला काहीशी चिंता निर्माण झालेली आहे. कामगार संघटनांनी असहकार आंदोलन पुकारले असून, भाऊबीजेला सामूहिक सुटी घेण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे प्रशासनाने खबरदारी म्हणून यापूर्वीच संबधितांना नोटीस बजावली आहे. भाऊबीजेला कोणालाही सुटी घेता येणार नसल्याने महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी म्हटले असून, सुट्टी घेणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा इशारा दिलेला आहे.

टॅग्स :Nashikनाशिकpassengerप्रवासीPublic Transportसार्वजनिक वाहतूक