शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

सौराष्ट्र कडे १५१ धावांचीआघाडी; महाराष्ट्राला फॉलोआॅन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 14:48 IST

नाशिक: सौराष्ट्र च्या ३९८ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या महाराष्ट्रा संघाचा डाव २४७ गुंडाळत े सौराष्ट्र ने १५१ धावांची आघाडी घेत ...

ठळक मुद्देरणजी करंडक क्रिकेट : केदार जाधवचे शतक एका धावेने हुकले

नाशिक: सौराष्ट्र च्या ३९८ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या महाराष्ट्रा संघाचा डाव २४७ गुंडाळत े सौराष्ट्र ने १५१ धावांची आघाडी घेत महाराष्ट्राला फॉलोआॅन दिला. शैलीदार फलंदाजी करणारा केदार जाधवचे शतक अवघ्या एका धावेने हुकले तर चिराग खुराना (३०) राहुल त्रिपाठी (३०),व सत्यजित बच्छाव (२१) यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र चेतन साकरीयाच्या भेदक गोलंदाजीपुढे महाराष्ट्राचे फलंदाज फारकाळ खेळपट्टीवर टिकू शकले नाही. शेवटचे वृत्त हाती आले तेंव्हा दुसऱ्या डावात महाराष्ट्राने एक बाद १७ धावा केल्या होत्या.गोल्फ क्लब मैदान येथे सुरू असलेल्या महाराष्ट्रा विरूद्ध सौराष्ट्र यांच्यातील रणजी क्रिकेट सामना तिसºया दिवशी रंगतदार वळणार येऊन ठेपला आहे. भरभक्कम आघाडी मिळविलेल्या सौराष्ट्र ने महाराष्ट्राला फॉलोआॅन दिला असून सामना निकाली काढण्यासाठी सौराष्ट्र ने रणनिती आखली आहे. तिसºया दिवशी ३ बाद ८४ वरून पुढे खेळतांना महाराष्ट्राचा केदार जाधव आणि अंकीत बावणे यांनी दमदार फलंदाजी केली. कालच्या नाबाद ३० धावांवर असलेल्या केदार जाधवने सावध फलंदाजी करीत धावफलक हालता ठेवला. त्याला अंकीत बावणे चांगली साथ देत असतांनाच संघाच्या १४३ धावा झालेल्या असतांना महाराष्ट्राला चौथा धक्का बसला. कर्णधार अंकीत बावणे १४ धावांवर खेळत असतांना त्याला साकरीयाने त्रिफळाचित केले. केदार जाधवला साध देण्यासाठी रोहित मोटवानी मैदानात उतरला मात्र तो केवळ ११ धावा काढून बाद झाला. राहुल त्रिपाठी सोबत केदारने संघाला सावरले दोघांनी ३२ धावांची भागिदारी करून संघाची पडझड थांबविली मात्र त्यांना फार काळ मैदानात उभे राहाता आले नाही. एकीकडे केदार एकाकी किल्ला लढत असतांना दुसºयाबाजूने पडझड सुरूच होती. पाच फलंदाज बाद झाल्यानंतर केदारने काहीसा आक्रामक खेळ करीत ९९ धावांपर्यंत मजल मारली मात्र भराभर धावा जमविण्याच्या नादात केदार ९९ धावांवर मकवानाचा बळी ठरला.त्यानंतर मैदानात उतरलेल्या सत्यजित बच्छाव आणि त्रिपाठीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्रिपाठी (३०) तर सत्यजित बच्छाव (२१) धावांवर बाद झाले. महाराष्ट्राचा संघ २४७ धावांवर गारद झाला. सौराष्ट्र च्या चेतन साकरीयाने ६ तर जयदेव उनाडकट याने दोन बळी मिळविला.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयRanji Trophyरणजी करंडक