शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकचे विद्रोही साहित्य संमेलन चळवळीला दिशा देणारे ठरेल; किशोर ढमाले यांचे मत

By संजय पाठक | Updated: February 12, 2021 15:47 IST

नाशिक- नाशिक हे ऐतिहासीक शहर आहे. प्रस्थापितांच्या विरोधातील लढ्याची तसेच आदिवासींच्या उठावाची  आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनाची नाशिकला पार्श्वभूमी आहे. त्यामुळे यंदा याच भूमीत होणारे हे संमेलन विद्रोही चळवळीला ऐतिहासीक दिशा देणारे ठरेल, असे मत विद्रेाही साहित्य संमेलनाचे मुख्य आयोजक किशोर ढमाले यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देउदघाटक म्हणून ग्रेटाशी संपर्क सुरूसंमेलनाध्यक्ष अद्याप निश्चित नाही

नाशिक-नाशिक हे ऐतिहासीक शहर आहे. प्रस्थापितांच्या विरोधातील लढ्याची तसेच आदिवासींच्या उठावाची  आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनाची नाशिकला पार्श्वभूमी आहे. त्यामुळे यंदा याच भूमीत होणारे हे संमेलन विद्रोही चळवळीला ऐतिहासीक दिशा देणारे ठरेल, असे मत विद्रेाही साहित्य संमेलनाचे मुख्य आयोजक किशोर ढमाले यांनी व्यक्त केले.

नाशिकमध्ये अखिल मराठीसाहित्य संमेलन होत असून त्याचवेळी विद्रोही साहित्य संमेलनही होणार आहे.त्याचीही तयारी सध्या सुरू आहे. त्या पार्श्वूभमीवर या संमेलनाचा किशोर ढमाले यांच्याशी साधलेला संवाद...

प्रश्न- नाशिकमध्ये पंधरावे विद्रेाही साहित्य संमेलन हेात आहे. सध्याचे वातारवरण बघता या संमेलनाकडून काय अपेक्षा आहेत?

ढमाले- जेथे पारंपरीक साहित्य संमेलन असते तेथे विद्रोही साहित्य संमेलन भरवले जाते. नाशिकमध्ये समोरासमेार म्हणजे एकाच वेळी भरविण्यात येणारे हे तिसरे संमेलन आहे. सध्या देशात विव्देषाचे वातावरण आहे. जातीय, धार्मिक तणावाचे वातावरण निर्माण होत आहे. देशातील शेतकरी अस्वस्थ आहे. देशाच्या घटनेतील लोकशाही मुल्य व्यवस्थेलाच आव्हान देण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे विद्रोही सांस्कृतीक चळवळीसमोर देखील आव्हान आहे. अशावेळी समतेचा विचार पसरविणारे हे संमेलन हेाणार आहे. त्यामुळे या परिस्थतीत हे संमेलन अधिक महत्वाचे आहे.

प्रश्न- संमेलनाच्या उदघाटनासाठी पर्यावरणवादी युवा नेत्या ग्रेटा थनबर्ग यांना निमंत्रीत करण्यात येणार होते..

ढमाले- होय, व्यवस्थेच्या विरोधात विद्रोह करणाऱ्या मान्यवरांना विद्रोही साहित्य संमेलनास नेहेमीच निमंत्रीत केले जाते. या पूर्वी तिसऱ्या विद्रोही साहित्य संमेलनासाठी अशाच प्रकारे अनेक देशांनी बंदी घातलेल्या डॉ. एजाज अहमद यांना निमंत्रीत करण्यात आले हेाते. आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यवरांना निमंत्रीत करताना यापूर्वीच आफ्रीकन लेखीका एंगेला डेव्हीस यांनाही निमंत्रीत करण्यात आले हेाते. यंदा ग्रेट थनबर्ग यांना निमंत्रीत करण्यात येणार असून त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. संमेलनास अजून सव्वा ते दीड महिना बाकी असून या कालवधीत निश्चितच त्यांच्याशी संपर्क साधला जाईल.

प्रश्न- साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी डॉ. यशवंत मनेाहर यांच्यासह काही नावे चर्चेत आहेत?

ढमाले- साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदाबाबत अद्याप कोणतीही चर्चा नाही. विद्रेाही सांस्कृतीक चळवळीचे पदाधिकारी रविवारी (दि.१४) नाशिकच्या स्थानिक आयेाजकांसमवेत बैठक घेणार आहेत. त्यानंतर दोन तीन टप्प्यात एकदा कार्यक्रमाची पूर्व तयारी झाली की अध्यक्षही ठरतील.

मुलाखत- संजय पाठक

 

टॅग्स :Nashikनाशिकliteratureसाहित्यmarathiमराठी