शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकच्या भाजीपाल्याचे ट्रक गुजरात सीमेवर अडवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 00:05 IST

पंचवटी : नाशिक जिल्ह्यातून शनिवारी (दि.१७) सायंकाळी द्राक्ष, तसेच भाजीपाला घेऊन जाणारे मालट्रक सापुतारा चेक नाक्यावर गुजरात राज्यातील पोलिसांनी अडवले असून, त्यामुळे याठिकाणी रात्री उशिरापर्यंत रांगा लागल्या होत्या. महाराष्ट्रात कोरोना वाढल्याने गुजरातमध्ये प्रवेश करण्यापूर्वी आरटीपीसीआर चाचणीचा नकारात्मक अहवाल नसल्याच्या कारणावरून हे ट्रक गेल्या दोन ते तीन तासांपासून अडवण्यात आले आहेत. शंभराहून अधिक मालवाहू वाहने संबंधित चेक नाक्यावर थांबून असल्याने वाहनांच्या दूरपर्यंत रांगा लागल्या आहेत.

ठळक मुद्देसापुतारा चेक नाका : कोरोना निगेटिव्ह अहवालासाठी अडवणूक

पंचवटी : नाशिक जिल्ह्यातून शनिवारी (दि.१७) सायंकाळी द्राक्ष, तसेच भाजीपाला घेऊन जाणारे मालट्रक सापुतारा चेक नाक्यावर गुजरात राज्यातील पोलिसांनी अडवले असून, त्यामुळे याठिकाणी रात्री उशिरापर्यंत रांगा लागल्या होत्या. महाराष्ट्रात कोरोना वाढल्याने गुजरातमध्ये प्रवेश करण्यापूर्वी आरटीपीसीआर चाचणीचा नकारात्मक अहवाल नसल्याच्या कारणावरून हे ट्रक गेल्या दोन ते तीन तासांपासून अडवण्यात आले आहेत. शंभराहून अधिक मालवाहू वाहने संबंधित चेक नाक्यावर थांबून असल्याने वाहनांच्या दूरपर्यंत रांगा लागल्या आहेत.कोरोना चाचणी आरटीपीसीआर अहवाल आणा मगच वाहने सोडू, अशी भूमिका गुजरात पोलिसांनी घेतल्याने गुजरात राज्याकडे शेतमाल, तसेच द्राक्षमाल घेऊन जाणाऱ्या शेकडो वाहनचालकांची मोठी अडचण झाली होती. सध्या संपूर्ण देशभर कोरोना विषाणूचा संसर्ग वाढल्याने शासनस्तरावर विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. राज्यभरात पंधरा दिवस कडक निर्बंध लागू केले असून, यामध्ये मालवाहतूकीला सूट देण्यात आली आहे. शनिवारी (दि.१७) सापुतारा चेक नाक्यावर नाशिक जिल्ह्यातील वणी दिंडोरी- ओझर- पिंपळगाव बसवंत भागातून द्राक्ष व भाजीपाला घेऊन जाणारी वाहने दोन तासांपासून अडवून ठेवल्याने वाहनचालकांची कोंडी झाली आहे. सापुतारा चेक नाक्यावर गुजरात राज्यात द्राक्ष व भाजीपाला घेऊन जाणारी वाहने अडविल्यानंतर दिंडोरी तालुक्यातील काही नागरिकांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याशी संपर्क साधून वाहने अडविली याबाबत तक्रार केली. त्यानंतर झिरवाळ यांनी जिल्हा प्रशासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी फोनवर संपर्क साधत चेक नाक्यावर थांबविलेल्या गाड्या गुजरातकडे रवाना करण्याच्या बाबतीत तोडगा काढण्याबाबत सूचना केल्या.

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सPoliceपोलिस