शहरं
Join us  
Trending Stories
1
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
2
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
3
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
4
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
5
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
6
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
7
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
8
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
9
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
10
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
11
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
12
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
13
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
14
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
15
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
16
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
17
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
18
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
19
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
20
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)

नाशिकचा गुलाब  दोन तासांत दिल्लीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 01:46 IST

अवघ्या दोन तासांमध्ये नाशिकच्या गुलाबासह इतरही फुले दिल्ली, बंगलोर, हैदराबाद या शहरांमधील बाजारपेठेत पोहोचू लागली आहेत.  जिल्ह्यातील फुले उत्पादक  शेतकऱ्यांना यामुळे  दिलासा मिळाला आहे. 

ठळक मुद्देदिलासा : एक महिन्यात पाठविल्या शंभरहून पेट्या

नाशिक : अवघ्या दोन तासांमध्ये नाशिकच्या गुलाबासह इतरही फुले दिल्ली, बंगलोर, हैदराबाद या शहरांमधील बाजारपेठेत पोहोचू लागली आहेत.  जिल्ह्यातील फुले उत्पादक  शेतकऱ्यांना यामुळे  दिलासा मिळाला आहे. ओझर येथील विमानतळावरून प्रवासी विमानसेवा सुरू झाल्याने, त्याचा आता शेतकऱ्यांनाही फायदा होऊ लागला असून, प्रवासी विमानांमधूनच आता फुलांचीही वाहतूक होऊ लागली आहे. मागील एक महिन्यापासून ही सेवा सुरू झाली असून, नाशिकमध्ये प्रथमच हा उपक्रम राबविला जात आहे.  दररोज दीड ते दोन टन विविध प्रकारची फुले  दिल्ली, बंगलोर, हैदराबाद या शहरांमध्ये पाठविली जात आहेत. अवघ्या दोन तासांमध्ये नाशिकमधील फुले या शहरातील बाजारपेठांमध्ये पोहोचत असल्यामुळे फुले ताजी आणि टवटवीत राहातात. यामुळे  तेथील बाजारात त्यांना चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना त्याचा लाभ होत आहे. अवघ्या महिनाभरात शंभरहून अधिक पेट्या या शहरांमध्ये पाठविण्यात आल्या आहेत. दर चांगला मिळत असल्याने, स्थानिक शेतकऱ्यांनाही विमानाने माल पाठविणे परवडत असून, माल पाठविण्याचे दरही आवाक्यात असल्याने, शेतकरी आपला माल विमानसेवेच्या माध्यमातून पाठवत आहेत. विशेषत: जानोरी, दिंडोरी येथील शेतकऱ्यांना त्याचा अधिक लाभ होत आहे. 

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती