शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

नाशिकच्या सार्वजनिक गणेशोत्सवातून १३४ मंडळांची माघार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 16:53 IST

१९२ मोठ्या मंडळांपैकी यंदा केवळ १५८ मंडळे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करत आहेत. त्याचप्रमाणे लहान मंडळांची संख्यादेखील ९७ने घटली असून यंदा ५०१ मंडळांची नोंद पोलिसांकडे झाली आहे.

ठळक मुद्देमंडळांची संख्या गतवर्षीच्या तुलनेत घटली आहेयावर्षीदेखील तरूणाईचा उत्साह तितकाच

नाशिक : विविध शासकिय नियम दिवसेंदिवस अधिकाधिक कठोर होत चालले असून दुसरीकडे महागाईमध्ये वाढ होऊ लागली आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी उत्सव साजरा करताना परिसरातून मंडळांना मिळणारी देणगीचे स्वरूपही कमी झाल्याने यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सवातून तब्बल १३४ मंडळांनी माघार घेतली आहे. मागील वर्षी ८२९ लहान-मोठ्या मंडळांची संख्या होती. यंदा मात्र एकूण ६९५ मंडळांची पोलीस प्रशासनाच्या विशेष शाखेकडे नोंद झाली आहे.सार्वजनिक गणेशोत्सवाचा उत्साह अन् आनंद तरूणाईचा गगणात मावेनासा असतो. तरूणाई मोठ्या आतुरतेने गणेशोत्सवाची वाट बघत असते. दरवर्षी तरूण मित्र मंडळांकडून सार्वजनिक गणेशोत्सवात हिरहिरीने भाग घेतला जातो. विविध सामाजिक, राजकिय विषयांवरील प्रबोधनपर देखावे असो किंवा आकर्षक आरासची सजावट करून आपल्या लाडक्या बाप्पाची प्रतिष्ठापना मंडळांकडून करण्यात येते. यावर्षीदेखील तरूणाईचा उत्साह तितकाच असला तरीदेखील महागाईचे सावट अन् बाजारपेठेत आलेल्या आर्थिक मंदीचा फटका गणेशोत्सवाला बसत असल्याचे दिसून येत आहे. महागाई आणि शासकिय, प्रशासकीय नियमावली अधिकाधिक कडक होत चालल्यामुळे यावर्षी अद्याप ६९५ मंडळांनी गणेशोत्सवात सहभाग घेतला आहे. मागील वर्षी ही संख्या ८२९ इतकी होती. यंदा मौल्यवान मंडळे ३६ असून गेल्या वर्षी ३९ मंडळे होती. तसेच १९२ मोठ्या मंडळांपैकी यंदा केवळ १५८ मंडळे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करत आहेत. त्याचप्रमाणे लहान मंडळांची संख्यादेखील ९७ने घटली असून यंदा ५०१ मंडळांची नोंद पोलिसांकडे झाली आहे. शहरात एकूण ६९५ मंडळांचा सार्वजनिक गणेशोत्सवात सहभाग आहे. मागील वर्षी ८२९ मंडळे सहभागी होती.

विधानसभा निवडणूक तोंडावरविधानसभा निवडणूक यंदा गणेशोत्सवाच्या तोंडावर असताना मंडळांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात होती. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मंडळांना सौजन्य करणाऱ्या राजकीय लोकप्रतिनिधींकडून नव्याने मंडळांची स्थापना करण्यात येईल, असे वाटत होते; मात्र मंडळांची संख्या गतवर्षीच्या तुलनेत घटली आहे. लहान मंडळांची संख्याही वाढलेली नाही.

पोलीस ठाणेनिहाय मंडळे अशी

पोलीस ठाणेमौल्यवानमोठेलहान एकूण
भद्रकाली १० ४२२८ ८०
मुंबईनाका ०१ ०६ १९ २६
सरकारवाडा ०६ ०४ ३८ ४८
पंचवटी ०४ १८ ४१ ६३
आडगाव 00०९२५ ३४
म्हसरूळ00०४ ३२३६
गंगापूर ०१ १८३४ ५३
सातपूर ०३ ११ ४३ ५७
अंबड०२०३ ९९ १०४
इंदिरानगर 00०५ ५०५५
उपनगर ०२ १२ ४५ ५९
ना.रोड00११ ३७ ४८
दे.कॅम्प 00०७ १५१०
एकूण३६१५८५०१ ९५

 

टॅग्स :NashikनाशिकGanesh Mahotsavगणेश महोत्सवGanesh Mandal 2019गणेश मंडळ 2019