शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
2
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
3
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
4
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
5
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
6
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
7
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
8
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
9
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
10
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
11
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
12
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
13
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
14
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
15
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
16
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा
17
'सैयारा'साठी 'या' रिअल लाईफ जोडीला होती ऑफर, मोहित सूरींनी बदलला निर्णय; कारण...
18
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
19
"तुझे ओठ सेक्सी आहेत, किस करू?", असित मोदींवर TMKOC फेम अभिनेत्रीचे गंभीर आरोप
20
"तो मला टॉर्चर करतोय"; पत्नीच्या पोलीस तक्रारीनंतर पती घरातून पळाला, पण त्यानंतर जे घडलं...

आनंदवनात पोहोचला नाशिकच्या द्राक्षांचा गोडवा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 22:21 IST

कसबे सुकेणे : गडचिरोलीच्या हेमलकसा आणि आनंदवनात आश्रयाला असलेले कुष्ठरुग्ण, अंध, दिव्यांग आणि आदिवासी बांधव सध्या नाशिकच्या द्राक्षांचा गोडवा चाखत आहेत. निफाड आणि दिंडोरी तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांनी सेवाभावातून संकलित केलेले तब्बल आठ क्विंटल द्राक्ष यंदाही आनंदवनात पोहोचली आहेत. २०१३ साली अवघ्या ५० किलो संकलित केलेल्या द्राक्षांवर सुरू झालेली ही द्राक्ष उत्पादकांची सेवाभाव माणुसकीची चळवळ यंदा तब्बल पंचवीस क्विंटलवर पोहोचली आहे.

ठळक मुद्देमाणुसकीची चळवळ : निफाड, दिंडोरीतील शेतकऱ्यांचा सेवाभाव

योगेश सगर ।लोकमत न्यूज नेटवर्ककसबे सुकेणे : गडचिरोलीच्या हेमलकसा आणि आनंदवनात आश्रयाला असलेले कुष्ठरुग्ण, अंध, दिव्यांग आणि आदिवासी बांधव सध्या नाशिकच्या द्राक्षांचा गोडवा चाखत आहेत. निफाड आणि दिंडोरी तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांनी सेवाभावातून संकलित केलेले तब्बलआठ क्विंटल द्राक्ष यंदाही आनंदवनात पोहोचली आहेत. २०१३ साली अवघ्या ५० किलो संकलित केलेल्या द्राक्षांवर सुरू झालेली ही द्राक्ष उत्पादकांची सेवाभाव माणुसकीची चळवळ यंदा तब्बल पंचवीस क्विंटलवर पोहोचली आहे.शेतकºयाला उगाच कोणी दाता म्हणत नाही, याची प्रचिती निफाड दिंडोरी तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांनी कृतीतून दर्शविली आहे. गारपीट, अवकाळी आणि दुष्काळ यावर वर्षभर सामना करीत कर्ज काढून घेतलेले द्राक्ष उत्पादन बाजारात विक्रीबरोबर या द्र्राक्षांचा गोडवा आदिवासी भागातील गोर गरीब, कुष्ठरोगी व दुर्बल घटकांपर्यंत पोहोचविण्याचा सेवाभाव या शेतकऱ्यांनी नि:स्वार्थ जपला आहे.दरवर्षीप्रमाणे यंदाही चंद्रपूरच्या डॉ. बाबा आमटे यांच्या आनंदवनात आणि मीडिया गोंड या आदिवासींसाठी स्थापन झालेल्या हेमलकसात आठ क्विंटल द्राक्ष पोहोचविण्यात आली आहे. ओझर महाविद्यालयाचा विद्यार्थी सचिन टिपाले २०१२ साली डॉ. शीतल आमटे यांच्या हेमलकसात झालेल्या श्रमसंस्कार शिबिरात सहभागी झाला. हे शिबिर यशस्वी पूर्ण करून आल्यावर सेवाभावातून नाशिकची द्राक्ष आनंदवनातील रुग्णांना देण्याची संकल्पना टिपाले याने कसबे सुकेण्याचे बाळासाहेब जाधव, छगन जाधव, शरद जाधव, महेश मोगल यांच्याकडे मांडली.जाधव बंधूंनीही या संकल्पनेला प्रत्यक्षात आणून २०१३ साली ५० पेटी द्राक्ष संकलित करून स्वखर्चाने रेल्वेने गडचिरोलीतील आनंदवनात आणि हेमलकसात पोहोचविली व नाशिकच्या द्राक्षांचा गोडवा आणि आनंद आदिवासींच्या चेहºयावर झळकविला. आनंदवनकडून आभारनिफाड आणि दिंडोरीतील हा सेवाभाव आता चळवळीत बदलला असून, द्राक्ष उत्पादक बापू पाटील, तिसगावचे संतोष भालेराव, मनोज भालेराव, प्रमोद भालेराव, अभिजित भालेराव, बबन भालेराव, शरद भालेराव, साकोºयाचे सतीश बोरस्ते, मौजे सुकेण्याचे महेश मोगल तसेच कसबे सुकेणे, सोनजांब, खेडगाव, जऊळके येथील काही द्राक्ष उत्पादक या उपक्र माशी जोडले गेले आहे. यंदा संकलित केलेली द्राक्ष घेण्यासाठी आनंदवनातून खास वाहन तिसगाव येथे आले होते. या उपक्रमाबद्दल आनंद-वनातील डॉ. शीतल आमटे यांनी नाशिकच्या द्राक्ष उत्पादकांची दखल घेत आभार मानले आहे.

दानशूर द्राक्ष उत्पादकांच्या सेवाभावातून २०१३ साली सुरू झालेला हा उपक्र म आज चळवळीत रूपांतरित झाला आहे, याचे मोठे समाधान आहे. यंदा आम्ही निर्यातक्षम दर्जाची द्राक्ष आनंदवनात पाठविली आहेत.- बबनराव भालेराव, द्राक्ष निर्यातदार, तिसगाव

नाशिकच्या शेतकºयांना आनंदवन खºया अर्थाने सलाम करीत आहे. आनंदवन आणि हेमलकसातील सेवाभाव कार्यात त्यांच्या या द्राक्ष भेटउपक्र माची निश्चितच दखल घेतली गेली आहे.- डॉ. शीतल आमटे, आनंदवन

टॅग्स :baba amteबाबा आमटेGreen Planetग्रीन प्लॅनेट