शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकच्या अशोकस्तंभ ते त्र्यंबकनाका या ‘स्मार्ट रोड’साठी मिळेना एजन्सी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 15:52 IST

प्रतिसाद नाही : फेरनिविदा काढल्या, येत्या ८ फेबु्रवारीला उघडणार निविदा

ठळक मुद्देडिसेंबर २०१७ पासूनच स्मार्ट रोडच्या कामाला सुरूवात करण्याचे नियोजन होतेएजन्सीचा प्रतिसादच मिळत नसल्याने कंपनी परेशान

नाशिक - स्मार्ट सिटी अंतर्गत शहरातील अशोकस्तंभ ते त्र्यंबकनाका या १.१ कि.मी. मार्गाचे स्मार्ट रोडमध्ये रुपांतर केले जाणार असून त्यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या निविदांना अवघ्या एकाच एजन्सीकडून प्रतिसाद लाभला. त्यामुळे कंपनीने फेरनिविदा काढली असून येत्या ८ फेबु्रवारीला निविदा उघडण्यात येणार आहेत. डिसेंबर २०१७ पासूनच स्मार्ट रोडच्या कामाला सुरूवात करण्याचे नियोजन होते. परंतु, एजन्सीचा प्रतिसादच मिळत नसल्याने कंपनी परेशान झालेली आहे.स्मार्ट सिटी अंतर्गत नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या कंपनीमार्फत अशोक स्तंभ ते त्र्यंबकनाका या दरम्यानच्या १.१ कि.मी. मार्गाचे स्मार्ट रोडमध्ये रूपांतर केले जाणार असून, त्यात आकर्षक पथदीपांसह सायकल ट्रॅक व वायफायसारख्या सुविधाही उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यासाठी सुमारे १६ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. आॅक्टोबर २०१७ पासून स्मार्ट रोडसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यास सुरुवात करण्यात आली. त्यावेळी महिनाभरात स्मार्ट रोडचे काम प्रत्यक्षात सुरू होणार असल्याचा दावा कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी केला होता. मात्र, निविदा प्रक्रियेत एकच एजन्सीने प्रतिसाद नोंदवला. प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किमान तीन एजन्सीचा सहभाग अपेक्षित असतो. परंतु, एकच एजन्सी पुढे आल्याने पुन्हा निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. कंपनीने स्मार्ट रोडचा आराखडा तयार केलेला असून त्याचे सादरीकरण केपीएमजी या प्रकल्प सल्लागार संस्थेने यापूर्वीच केलेले आहे. सदर स्मार्ट रोडची नाशिककरांना मोठी उत्सुकता लागून राहिलेली आहे. मध्यंतरी, हा स्मार्ट रोड पुढे मुंबईनाक्यापर्यंत नेण्याची मागणी आमदार देवयानी फरांदे यांनी कंपनीकडे केली होती. परंतु, सदर स्मार्ट रोडची संकल्पना ही केवळ अ‍ेबीडी अर्थात एरिया बेस डेव्हलपमेंट या भागातच राबविण्यात येत असल्याने कंपनीने त्याच्या विस्ताराबाबत असमर्थता दर्शविली होती मात्र, महापालिका आयुक्तांनी भविष्यात मनपाच्या माध्यमातून सदर रोड साकारण्याचे आश्वासन दिले होते. दरम्यान, स्मार्ट रोडबाबत एजन्सी पुढे येत नसल्याने कंपनीचे अधिकारी परेशान आहेत.कंपनीवर वाढता दबावपुढील वर्षी लोकसभा-विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्मार्ट सिटीची संकल्पना काही अंशी तरी जनतेसमोर प्रकट व्हावी, त्यातून काही प्रकल्प पूर्णत्वाला जावेत, याकरीता कंपनीच्या अधिका-यांवर मोठा दबाव वाढला आहे. सन २०१८ मध्ये जास्तीत जास्त प्रकल्प लोकांच्या सेवेत आणण्याचा प्रयत्न सरकारचा आहे. मात्र, कंपनीचा पायलट प्रोजेक्ट असलेल्या स्मार्ट रोडलाच अद्याप मुहूर्त लागू शकलेला नाही. त्यामुळे कंपनीच्या अधिका-यांमध्ये अस्वस्थता आहे.

टॅग्स :Nashikनाशिक