शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीच्या ‘त्या’ सोहळ्यात नाशिकच्या ३२ जणांची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 00:25 IST

दिल्लीमधील निजामुद्दीन भागात झालेल्या सोहळ्यातही नाशिक कनेक्शन असल्याचे समोर आले आहे. या सोहळ्याला हजेरी लावलेल्या नाशिक जिल्ह्णातील तब्बल ३२ व्यक्तींची प्रशासनाने खात्री पटविली आहे. शहरासह जिल्ह्णात आरोग्य विभागाच्या चार पथकाने पोलीस प्रशासनाच्या मदतीने शोध मोहीम राबवून त्यापैकी २४ नागरिकांना हुडकून काढण्यात आले.

ठळक मुद्देचिंतेत भर : नाशिक मनपा हद्दीतील २१; उर्वरित ग्रामीण भागातील

नाशिक : दिल्लीमधील निजामुद्दीन भागात झालेल्या सोहळ्यातही नाशिक कनेक्शन असल्याचे समोर आले आहे. या सोहळ्याला हजेरी लावलेल्या नाशिक जिल्ह्णातील तब्बल ३२ व्यक्तींची प्रशासनाने खात्री पटविली आहे. शहरासह जिल्ह्णात आरोग्य विभागाच्या चार पथकाने पोलीस प्रशासनाच्या मदतीने शोध मोहीम राबवून त्यापैकी २४ नागरिकांना हुडकून काढण्यात आले. त्यातील नाशिक मनपा हद्दीतील १३ नागरिकांना तपोवनात क्वॉरंटाइन करण्यात आले आहे. उर्वरित ८ नागरिक अद्याप नाशकात आलेले नाहीत. तर ग्रामीण भागातील ११ व्यक्तींना त्यांच्या घरीच क्वॉरंटाइन करण्यात आले आहे.दिल्लीच्या निजामुद्दीन परिसरात झालेल्या आंतरराष्ट्रीय सोहळ्यात तब्बल दोन हजार लोकांनी हजेरी लावली असल्याचे सांगितले जात आहे. यामधील काही लोक कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे. या सोहळ्याला संपूर्ण देशातून लोक गेले होते, यामुळे प्रशासनाची झोप उडाली आहे. महाराष्ट्रासह अन्य राज्यांतील बहुसंख्य नागरिक यामध्ये सहभागी झाले होते. महाराष्टÑातून या कार्यक्रमासाठी १०७ जण गेले होते. ते परतल्यानंतर आता कोरोनाचा धोका अधिक वाढल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, नाशिक जिल्ह्णातील अनेक नागरिक या सोहळ्याला गेले असावे, असा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे. त्यापैकी ३२ नागरिक आरोग्य विभाग व पोलिसांनी शोधून काढले आहेत. नाशिक मनपा हद्दीत आढळलेल्या १३ नागरिकांना तपोवनातील मनपाच्या शासकीय निवासस्थानी क्वॉरंटाइन करण्यात आले आहे. तर उर्वरित ८ नागरिकांचा पोलीस तपास करीत आहेत.या पथकांनी नाशिक शहरासह ग्रामीण भागात अशा लोकांचा शोध घेतला. नाशिकमध्ये तर महापलिकेच्या वैद्यकीय पथकाने दिल्लीत जाऊन आलेल्या नागरिकांची माहिती घेतल्यानंतर संबंधितांचा शोध घेण्यासाठी पोलीस आयुक्तांकडे यादी सोपवली होती. नाशिक शहरातील काही ठराविक उपनगरीय भागातील तसेच मालेगाव, निफाड, चांदवड, नांदगाव या तालुक्यांतील काही गावांमधील संबंधित नागरिक असल्याचे समजते.च्नाशिक शहरातील अनेक जण या कार्यक्रमाला गेले होते. त्यांची यादी महापालिकेने पोलीस यंत्रणेकडे सुपूर्द केली आहे. सध्या सापडलेल्या १३ जणांना तपोवनात क्वॉरंटाइन करण्यात आले असून उर्वरित आठ व्यक्तींचा कसून शोध घेतला जात आहे. त्यांना हुडकून काढल्यानंतर त्यांनादेखील तपोवनात क्वॉरंटाइन केले जाणार आहे. तपोवनातील मनपा इमारतीत देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य