लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : मद्याच्या नशेत नाशिकरोडच्या बसस्टॅण्डवर झोपलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील माजी सैनिकाच्या बॅगमधील पिस्तुल, जिवंत काडतुसे व कागदपत्रे चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शुक्रवारी (दि़४) रात्रीच्या सुमारास घडली आहे़राजेंद्र सोपान मंडलीक (४२, रा़उंचखडक बु़ता़अकोले) यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार शुक्रवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास ते मद्याच्या नशेत नाशिकरोड बसस्थानकावर आले होते़ मंडलीक यांनी आपली टुरीस्टर बॅग उशाला घेतली व झोपी गेले़ या कालावधीत चोरट्यांनी त्यांच्या बॅगेतील चॉकलेटी रंगाचे ०़३२ चे पिस्तुल, सात नग जिवंत काडतुस, दोन मॅगझीन, मिलिटरी डिस्चार्ज बुक, पीपीओ आधार कार्ड, इसीसीएचएस कार्ड, माजी सैनिक ओळखपत्र, सेंट्रल बँकेचे एटीएम, कागदपत्र असा २० हजार ३५० रुपयांचा ऐवज चोरून नेला़याप्रकरणी मंडलीक यांच्या फिर्यादीवरून नाशिकरोड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माजी सैनिकाच्या बॅगमधील पिस्तुलची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 17:08 IST
लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : मद्याच्या नशेत नाशिकरोडच्या बसस्टॅण्डवर झोपलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील माजी सैनिकाच्या बॅगमधील पिस्तुल, जिवंत काडतुसे व कागदपत्रे चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शुक्रवारी (दि़४) रात्रीच्या सुमारास घडली आहे़राजेंद्र सोपान मंडलीक (४२, रा़उंचखडक बु़ता़अकोले) यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार शुक्रवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास ते मद्याच्या नशेत नाशिकरोड बसस्थानकावर ...
माजी सैनिकाच्या बॅगमधील पिस्तुलची चोरी
ठळक मुद्दे पिस्तुल, जिवंत काडतुसे व कागदपत्रे चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना नाशिकरोड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल