शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षा, टॅक्सीचे आयुर्मान २० वर्षे कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 19:44 IST

पंचवटी : नाशिक प्रादेशिक परिवहन प्राधिकरण यांचा रिक्षा व टॅक्सी यांच्या २० वर्षे या अधिकतम वयोमर्यादे बाबतचा निर्णय मुंबई ...

ठळक मुद्देउच्च न्यायालयाचा निर्णय : नाशिक प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचा ठराव

पंचवटी : नाशिक प्रादेशिक परिवहन प्राधिकरण यांचा रिक्षा व टॅक्सी यांच्या २० वर्षे या अधिकतम वयोमर्यादे बाबतचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवला असल्याने या वाहनांचे आयुर्मान पुर्वीप्रमाणेच २० वर्षा इतके असेल अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी पत्रकान्वये दिली आहे.राज्य परिवहन प्राधिकरणाने २९ एप्रिल २०१३ बैठकीत ठराव क्र मांक ७/२०१३ पारेषित करून मुंबई महानगर प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रात मीटर टॅक्सी मूळ नोंदणी दिनांकापासून २० वर्षे, आॅटोरिक्षा १६ वर्षानंतर परवान्यावरून उतरविण्यात याव्यात व सदर वाहने स्क्र ॅप करावे असा निर्णय घेतला होता त्या अनुषंगाने राज्यातील प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने याबाबत निर्णय घेण्याचे कळविले होते.जुन्या वाहनामुळे वाढणारे प्रदूषण कमी करून पर्यावरणाला हानी पोहोचवणे कमी व्हावे, वाहनाच्या जास्तीच्या वापरामुळे वाहनाची धोकादायक परिस्थिती निर्माण झाली असते त्यातून रस्ते अपघाताची शक्यता वाढते प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळावी याबाबत विचार करून तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने राज्य परिवहन प्राधिकरण ठरावास अनुसरून २१ डसेंबर २०१७ बैठकीत ठराव क्र मांक ०९/२०१७ नुसार टॅक्सी आॅटो रिक्षाची वयोमर्यादा मूळ नोंदणी दिनांकापासून २० वर्षे व कुल कॅब १२ वर्षे निश्चित करण्याचा निर्णय घेतला होता. सदर ठराव जून २०१८ मध्ये अंमलात आला त्यानुसार ३१२५ आॅटो रिक्षा तर ३२७ टॅक्सी कालबाह्य ठरले होते त्यापैकी ३१ जुलै २०१९ पर्यंत २१२७ रिक्षा व ६३ टॅक्सी स्क्र ॅप करण्यात आल्या होत्या.प्रादेशिक परिवहन प्राधिकरण यांच्या टॅक्सी व रिक्षा अधिकतम वयोमर्यादा निर्णयास हैदर मोहम्मद सय्यद व इतरांनी हरकत घेत उच्च न्यायालयात जनिहत याचिका दाखल केली होती. जनिहत याचिका दरम्यान प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल कदम, सुनील आहेर, भरत चौधरी यांचा मोलाचा सहभाग होता.

टॅग्स :NashikनाशिकRto officeआरटीओ ऑफीस