शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत वीटभट्ट्या बंद करण्याचा ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 22:35 IST

ग्रामपंचायतीची कोणतीही परवानगी न घेता ग्रामपंचायत हद्दीत सुरू असलेल्या वीटभट्ट्या बंद करण्याचा ठराव लाडची ग्रामपंचायतीने केला असून, यासंदर्भातील निवेदन जिल्हाधिकाऱ्यांनादेखील देण्यात आले आहे. अनधिकृत वीटभट्ट्यांमुळे परिसरातील शेतपिकांचे नुकसान होत असल्याचे सरपंच रेखा कडाळे यांनी सांगितले.

ठळक मुद्देलाडची ग्रामपंचायत : ना हरकत दाखल न घेताच व्यवसाय; पिकांचेही नुकसान राखेच्या कणांमुळे परिसरातील पिकांचे नुकसान

नाशिक : ग्रामपंचायतीची कोणतीही परवानगी न घेता ग्रामपंचायत हद्दीत सुरू असलेल्या वीटभट्ट्या बंद करण्याचा ठराव लाडची ग्रामपंचायतीने केला असून, यासंदर्भातील निवेदन जिल्हाधिकाऱ्यांनादेखील देण्यात आले आहे. अनधिकृत वीटभट्ट्यांमुळे परिसरातील शेतपिकांचे नुकसान होत असल्याचे सरपंच रेखा कडाळे यांनी सांगितले.नाशिक तालुक्यातील गिरणारेजवळील लाडची येथील ग्रामपंचायतीने परिसरातील वीटभट्टीविरोधात ठराव मंजूर करताना वीटभट्ट्यांमुळे नागरिकांच्या आणि शेतपिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याचे म्हटले आहे. या परिसरात अनेक वीटभट्ट्या अनधिकृत सुरू असल्याचे सरपंच कडाळे यांचे म्हणणे आहे. ग्रामपंचायत हद्दीच्या परिसरात अनेक वीटभट्ट्या या अनधिकृत आहेत. नियमानुसार व्यवसाय सुरू करताना संबंधित ग्रामपंचायतीची परवानगी घेणे अपेक्षित होते; परंतु एकाही वीटभट्टीचालकाने परवानगीसाठीचा म्हणजेच ना हरकत दाखल्यासाठी अर्ज दाखल केलेला नाही. त्यामुळे या सर्व वीटभट्ट्या अनधिकृत असल्याचे ग्रामपंचायतीचे म्हणणे आहे.यासंदर्भात ग्रामपंचायतीने ठराव करून व्यवसाय करण्यास नकार देण्यात आला आहे. या व्यवसायाच्या ठिकाणी अनेक मजूर बाहेरगावचे आणले जातात. या मजुरांची कोणतीही आरोग्य तपासणी केली जात नाही तसेच त्यांच्या राहण्याच्या ठिकाणीदेखील अस्वच्छता असते. त्यामुळे गावात आजार पसरण्याची भीती असून, या प्रकरणी वीटभट्टी मालकदेखील बेफिकिरीने वागत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याशिवाय वीटभट्टीतून उडणाºया राखेच्या कणांमुळे परिसरातील पिकांचे नुकसान होत असल्याची तक्रार शेतकरी करीत आहेत.या सर्व प्रकरणांमुळे लाडची ग्रामपंचायतीने सदर व्यवसाय बंद करण्याचा ठराव केला आहे. या प्रकरणी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांना निवेदन देण्यात आले असून, याप्रसंगी लाडची गावच्या सरपंच रेखा कडाळे, सुनील कडाळे, उपसरपंच मुरलीधर पारधी, सदस्य राजाराम कडाळे, अनुसया मोरे, सावळीराम फसाळे तसेच बहुसंख्य ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिकgram panchayatग्राम पंचायत