शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य विद्यापीठात पहिली संशोधन परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 20:27 IST

कुलगुरूंच्या हस्ते उद्घाटन : विविध विद्याशाखांच्या मान्यवरांचे मार्गदर्शननाशिक : आरोग्य शिक्षणातील संशोधनाला चालना देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या राज्यस्तरीय संशोधन परिषदेचे उद्घाटन कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्या हस्ते झाले. विद्यापीठाच्या सभागृहात झालेल्या एकदिवसीय परिषदेत विविध विद्याशाखांतील तज्ज्ञांनी संशोधनाच्या तांत्रिक मुद्द्यावर मार्गदर्शन केले.उद्घाटनप्रसंगी कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर म्हणाले, आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय ...

ठळक मुद्देवैद्यकीय, दंत, आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी चा सहभाग पदवी व पदव्युत्तर, पीएचडी, विद्यार्थी व अध्यापक यांचा सहभाग

कुलगुरूंच्या हस्ते उद्घाटन : विविध विद्याशाखांच्या मान्यवरांचे मार्गदर्शननाशिक : आरोग्य शिक्षणातील संशोधनाला चालना देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या राज्यस्तरीय संशोधन परिषदेचे उद्घाटन कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्या हस्ते झाले. विद्यापीठाच्या सभागृहात झालेल्या एकदिवसीय परिषदेत विविध विद्याशाखांतील तज्ज्ञांनी संशोधनाच्या तांत्रिक मुद्द्यावर मार्गदर्शन केले.उद्घाटनप्रसंगी कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर म्हणाले, आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर संशोधन प्रकल्प नामांकित होण्यासाठी विद्यार्थ्यांनी दर्जेदार संशोधनासाठी प्रयत्न करणे अपेक्षित आहे. संशोधनाच्या मान्यतेसाठी नेहमीच काही त्रुटी राहतात. या त्रुटी दूर करून प्रकल्प सादर केल्यास मान्यता देणे सुलभ होते, असे कुलगुरू म्हणाले. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधन प्रकल्प सादर करताना इच्छुक संशोधकांनी विहित नमुन्यात, योग्य पद्धतीचा तसेच संबंधित प्रकल्पासाठी आखून दिलेल्या नियमावलीचा अवलंब करून प्रकल्प सादर केले पाहिजे. परंतु आजही अनेक प्रकल्प संशोधकाने योग्य पद्धतीने सादर केले जात नसल्याने मान्यता प्रदान करताना अडचणी येतात. यासाठी सर्व संशोधकांनी प्रकल्प सादर करताना बारीकसारीक बाबींची काळजी घेतली पाहिजे, असे कुलगुरू म्हैसेकर म्हणाले.प्रति-कुलगुरू डॉ. मोहन खामगावकर म्हणाले, विद्यार्थी व अध्यापकांमध्ये संशोधनवृत्ती वाढीस लागावी यासाठी विद्यापीठातर्फे राज्यात नाशिकसह नवी मुंबई, पुणे व नांदेड या ठिकाणी राज्यस्तरीय संशोधन परिषदांचे आयोजन करण्यात आले आहे. कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. राज्यस्तरीय आरोग्य विज्ञान शिक्षण तंत्रज्ञान संशोधन परिषदेमध्ये विद्यापीठाच्या वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी व तत्सम विद्याशाखेतील विद्यार्थिनींनी सहभाग घेतला आहे. या कार्यशाळेत विविध विद्याशाखेतील पदवी व पदव्युत्तर, पीएचडी, विद्यार्थी व अध्यापक यांनी सहभाग नोंदविला आहे.दरम्यान, या परिषदेमध्ये संशोधनाला चालना मिळण्यासाठी आंतरविद्यासंशोधन विभाग, योगशास्त्र, सार्वजनिक आरोग्य पोषणशास्त्र या विषयांवर सहभागी विद्यार्थी व आध्यापकांना संबंधित विषयातील तज्ज्ञ शिक्षकांनी मार्गदर्शन केले. या पहिल्या राज्यस्तरीय आरोग्य विज्ञान शिक्षण तंत्रज्ञान संशोधन परिषदेच्या समारोप सत्रात महात्मा गांधी दंत महाविद्यालयाचे डॉ. त्रिवेणी काळे, अहमदनगरचे वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. प्राजक्ता घाटगे, पुण्याचे संचेती कॉलेज आॅफ फिजिओथेरपीचे डॉ. अपूर्ण शिंपी, ठाण्याचे राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. स्वप्नील कदम यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

टॅग्स :Nashikनाशिकuniversityविद्यापीठ