शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

बॅँकांसमोर खातेदारांच्या रांगा; सोशल डिस्टन्सिंगकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 16:00 IST

नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर सर्वसामान्य आणि आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांपुढे आर्थिक प्रश्न निर्माण झाल्याने त्यांना दिलासा देण्यासाठी महिलांच्या ...

ठळक मुद्देनियमांची पायमल्ली : बॅँका उघडण्यापूर्वीच होते गर्दी

नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर सर्वसामान्य आणि आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांपुढे आर्थिक प्रश्न निर्माण झाल्याने त्यांना दिलासा देण्यासाठी महिलांच्या जनधन खात्यात ५०० रुपये जमा झाल्याने सदर रक्कम काढण्यासाठी बॅँकांबाहेर महिला खातेधारकांची गर्दी होऊ लागली आहे. काही ठिकाणी सोशल डिस्टन्स मेन्टेन करणे कठीण झाले आहे, तर काही बॅँकांच्या व्यवस्थापनाने वेळेचे आणि गर्दीचे नियोजन केल्याचेही दिसून आले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या लॉकडाउनचा काळ सुरू असल्याने सर्वसामान्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. दैनंदिन कामकाज करून रोजीरोटी भागविणाऱ्या वर्गाला या लॉकडाउनचा फटका बसत असल्याने अशा घटकासाठी अनेक संस्था, संघटनांनी मदतीचा हात पुढे केला आहे, तर केंद्र शासनानेदेखील महिलांच्या जनधन खात्यात ५०० रुपये जमा केले आहे. पीएम किसान योजनेचेदेखील पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले आहेत. त्याप्रमाणेच १ ते ७ तारखेपर्यंत अनेक शासकीय सेवानिवृत्त कर्मचाºयांचे पेन्शनदेखील आलेले आहेत. त्यामुळे बॅँकांमध्ये एकच गर्दी झाल्याचे दिसून आले.मागील आठवड्यापासून बॅँकांमध्ये दाखल झालेल्या रकमा काढून घेण्यासाठी महिला खातेदारांची गर्दी होत आहे. शहर आणि जिल्ह्यातील १२ राष्टÑीयीकृत बॅँकांमध्ये असलेल्या जनधन खात्यात पैसे जमा झाले आहेत. त्यामुळे पैसे काढण्यासाठी दिवसेंदिवस गर्र्दी वाढतच आहे. शनिवार आणि रविवार शासकीय सुटी असल्याने बॅँका बंद होत्या. सोमवारी महावीर जयंतीची शासकीय सुटी होती. त्यामुळे मंगळवारी बॅँका उघडल्यानंतर बॅँकांसमोर रांगाच रांगा लागल्या होत्या. शहरातील शासकीय बॅँकांबाहेर तसेच एटीएमच्या बाहेरदेखील महिला खातेदारांच्या रांगा दिसून आल्या.

टॅग्स :Nashikनाशिकbankबँक