शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नववर्ष स्वागत यात्रेतून होणार जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 18:08 IST

उपक्रम: गुढीपाडव्यानिमित्त विविध उपक्रम नाशिक : गेल्या तीन वर्षांपासून गुढीपाडव्यानिमित्ताने काढण्यात येणाऱ्या स्वागत यात्रेच्या माध्यमातून कला, संस्कृतीचे दर्शन घडविले ...

उपक्रम: गुढीपाडव्यानिमित्त विविध उपक्रमनाशिक : गेल्या तीन वर्षांपासून गुढीपाडव्यानिमित्ताने काढण्यात येणाऱ्या स्वागत यात्रेच्या माध्यमातून कला, संस्कृतीचे दर्शन घडविले जात असतांना यंदा मात्र पाणीबचत आणि मतदान जनजागृती मोहिम राबविली जाणार आहे.अत्रेयनंदन बहुद्देशीय सांस्कृतिक व सामाजिक संस्था कामटवाडे व नववर्ष स्वागत यात्रा समिती यांच्यावतीने गुढीपाडव्या निमित्त काढण्यात येणाऱ्या नववर्ष स्वागत यात्रेत या वर्षी १०० टक्के मतदान, पाणी बचत, एकात्मिकता याबाबत चित्ररथ तयार करून जनजागृतीकरून करण्यात येणार असल्याची माहिती नववर्ष स्वागत समितीच्या अध्यक्ष प्रा. वैशाली शिंदे, कार्याध्यक्ष राजेंद्र फड, कोषाध्यक्ष योगेश मांडे, सचिव राजेश मालपुरे यांनी दिली.सिडको परिसरात तीन वर्षापासून गुडीपाडवानिमित्त सर्व समाजाचे संघटन व समाज प्रबोधन तसेच सिडको परिसरात सांस्कृतिक अभिसरण व्हावे या हेतूने नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे. या यात्रेत सामाजिक संस्था, सामाजिक मंडळे, विविध शैक्षणकि संस्था यांचा सहभाग असतो. शोभायात्रेत पारंपारिक ढोलपथक, झांजपथक, ध्वजपथक, लेझीम सहभागी होणार आहे.शनिवार दि ६ एप्रिल रोजी सकाळी ०६:३० वा. सिडको परिसरातून वावरेनगर चौक ते माउली लॉन्स व धन्वंतरी कॉलेज ते वावरेनगर चौक ते माउली लॉन्स आणि पवननगर मारूती मंदिर ते माऊली लॉन्स या तीन वेगवेगळ्या ठिकाणावरून सुरु होऊन डी.जी.पी. नगर-२ माउली लॉन्स शेजारी ठाणे जनता सहकारी बँकसमोर कामटवाडे येथे सकाळी ८.०० वा. एकत्र येणार आहे. या शोभा यात्रेत परिसरातील नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

 

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक