शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

माता मृत्यू रोखण्यासाठी खासगी वैद्यकीय सेवा घेण्याची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 21:18 IST

नाशिक : आरोग्यकेंद्र आणि उपकेंद्रामध्ये कमीत कमी प्रसूती करून ग्रामीण रुग्णालयातच प्रसूती व्हावी यासाठी रुग्णालय सुसज्ज करण्याबरोबरच खासगी तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा घेण्याबाबत शासन विचार करीत असल्याचे राज्याच्या आरोग्य विभागाचे आायुक्त संजीवकुमार यांनी सांगितले.

ठळक मुद्देसंजीवकुमार : ग्रामीण भागातील माता मृत्यू रोखण्याचे आव्हानग्रामीण रुग्णालय सुसज्ज करण्याकडे भर

नाशिक : आरोग्यकेंद्र आणि उपकेंद्रामध्ये कमीत कमी प्रसूती करून ग्रामीण रुग्णालयातच प्रसूती व्हावी यासाठी रुग्णालय सुसज्ज करण्याबरोबरच खासगी तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा घेण्याबाबत शासन विचार करीत असल्याचे राज्याच्या आरोग्य विभागाचे आायुक्त संजीवकुमार यांनी सांगितले.शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांची विभागीय बैठक जिल्हा परिषदेच्या सभागृहात घेण्यात आली. यावेळी संजीवकुमार यांनी माता मृत्यूचा विभागनिहाय आढावा घेतला. जिल्हा रुग्णालयात गर्भवतींना पाठविण्याचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने शहरातील खासगी डॉक्टरांची मदत घेण्यासाठी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य खात्याकडून चाचपणी केली जात असल्याचे आणि ग्रामीण रुग्णालय सुसज्ज करण्याकडे भर दिला जाणार आहे असे त्यांनी सांगितले.जिल्हा परिषदेच्या सभागृहात आरोग्य खात्याच्या अधिकाºयांची विभागीय बैठक घेऊन आयुक्त संजीवकुमार यांनी सार्वजनिक आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते उपस्थित होते. यावेळी संजीवकुमार यांनी सार्वजनिक आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी कालबद्ध आरोग्य कार्यक्रम आखण्याची गरज असल्याचे सांगितले. यावेळी संजीव कुमार यांनी विविध विषयांचा आढावा घेताना माता मृत्यू व बाल मृत्यू याकडे अधिक लक्ष देऊन काम करण्याच्या सूचना सर्व उपस्थितांना केल्या. घरी प्रसूती होत असल्याने माता तसेच बाल मृत्यूचे प्रमाण वाढते त्यामुळे एकही प्रसूती घरी होणार नाही यासाठी सर्व आरोग्य यंत्रणेने दक्ष राहून काम करावे असेही ते म्हणाले.यावेळी बोलताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी नाशिक जिल्ह्यात माता मृत्यू व बाल मृत्यू कमी करण्यासाठी प्रभावी नियंत्रण करण्यात येत असून, अ‍ॅनेमिया व हिमोग्लोबीन याबाबतदेखील चांगले काम करण्यात येईल, असे आश्वासन आयुक्त संजीव कुमार यांना दिले.आढावा बैठकीस अतिरिक्त अभियान संचालक डॉ. सतीश पवार, सहसंचालक डॉ. शशिकांत जाधव, सहायक संचालक अनिरु द्ध देशपांडे, डॉ. एन. डी. देशमुख, नाशिक मंडळाचे उपसंचालक डॉ. सुरेश जगदाळे, डॉ. आर. बी. निगडे, डॉ. महेंद्र जगताप, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय डेकाटे यांच्यासह नाशिक विभागातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, जिल्हा माता संगोपन अधिकारी आदी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिकnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद