पंचवटी : रस्त्याने पायी फिरणाºया विशेषत: वृद्ध महिलांना एकटे गाठून त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून दुचाकीवरून फरार होणाºया दोघा सोनसाखळी चोरट्यांना पंचवटी पोलिसांनी अटक केली आहे़ कृष्णा सतीश वाघ व विलास राजूर मिरजकर (रा़ नवनाथनगर, पेठरोड, पंचवटी) अशी या दोघांची नावे असून, त्यांच्याकडून तीन लाख रुपये किमतीचे तब्बल दहा तोळे वजनाचे सोन्याचे दागिनेही जप्त करण्यात आले आहेत़पंचवटीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांना दोन दिवसांपूर्वी संशयित वाघ व मिरजकर या सोनसाखळी चोरट्यांबाबत माहिती मिळाली होती़ त्यानुसार पोलीस निरीक्षक आनंदा वाघ, पोलीस उपनिरीक्षक महेश इंगोले, शैलेंद्र म्हात्रे, सतीश जगदाळे, प्रवीण कोकाटे, आप्पा गवळी, सुरेश नरवडे, सतीश वसावे, मोतीराम चव्हाण, संदीप शेळके, सचिन म्हस्दे, महेश साळुंके, भूषण रायते, प्रभाकर पवार, दशरथ निंबाळकर, विलास चारोस्कर यांचे पथक तयार करून संशयितांचा शोध सुरू केला. हे दोघे पंचवटीत आल्याचे कळताच सापळा रचून त्यांना ताब्यात घेतल्यानंतर कसून चौकशी केली असता त्यांनी शहरातील विविध भागात सोनसाखळी चोरीची कबुली पोलिसांकडे दिली़पोलिसांनी या संशयितांकडून चार सोनसाखळ्या, अंगठ्या, सोन्याची लगड असे तीन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या दोघांनाही न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली असून, त्यांच्याकडून शहरातील आणखी सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे़
दोन चेनस्नॅचर्सला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 23:38 IST
पंचवटी : रस्त्याने पायी फिरणाºया विशेषत: वृद्ध महिलांना एकटे गाठून त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून दुचाकीवरून फरार होणाºया दोघा सोनसाखळी चोरट्यांना पंचवटी पोलिसांनी अटक केली आहे़ कृष्णा सतीश वाघ व विलास राजूर मिरजकर (रा़ नवनाथनगर, पेठरोड, पंचवटी) अशी या दोघांची नावे असून, त्यांच्याकडून तीन लाख रुपये किमतीचे तब्बल दहा तोळे वजनाचे ...
दोन चेनस्नॅचर्सला अटक
ठळक मुद्दे दहा तोळे सोन्याचे दागिने जप्तपोलीस ठाण्यात गुन्हा दाखल