शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

पेन्शनर्स  प्रश्नांवर  २२ हजार कोटींचा अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 19:00 IST

दिल्ली येथे झालेल्या आॅल इंडिया पेन्शनर्स कोआॅर्डिनेशन अधिवेशनानंतर पेन्शनर्सच्या प्रश्नांवर अनेक पक्षांच्या खासदारांनी बाजू मांडण्याची ग्वाही दिली आहे. यावेळी केंद्रीयमंत्री संतोषकुमार गंगवार यांच्याशी शिष्टमंडळाने चर्चा केल्यानंतर पेन्शनर्सचे आर्थिक प्रश्न सोडविण्यासाठी सुमारे २२ हजार कोटींच्या निधीची आवश्यकता असल्याचा अहवाल अर्थ मंत्रालयाकडे पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले.

ठळक मुद्देपेन्शनर्स फेडरेशनचा दावा : अहवालाच्या प्रतींची मागणीअधिवेशनानंतर पेन्शनर्सच्या विषयाला चालना

नाशिक : दिल्ली येथे झालेल्या आॅल इंडिया पेन्शनर्स कोआॅर्डिनेशन अधिवेशनानंतर पेन्शनर्सच्या प्रश्नांवर अनेक पक्षांच्या खासदारांनी बाजू मांडण्याची ग्वाही दिली आहे. यावेळी केंद्रीयमंत्री संतोषकुमार गंगवार यांच्याशी शिष्टमंडळाने चर्चा केल्यानंतर पेन्शनर्सचे आर्थिक प्रश्न सोडविण्यासाठी सुमारे २२ हजार कोटींच्या निधीची आवश्यकता असल्याचा अहवाल अर्थ मंत्रालयाकडे पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी खासदार हेमंत गोडसे यांनीदेखील मंत्री महोदयांच्या सचिवांना भेटून सदर अहवालाची मागणी केली. अहवालानंतर भूमिका निश्चित करण्याचा निर्णय समन्वय समितीने जाहीर केला.गेल्या ७ आणि ८ मार्च रोजी दिल्लीत झालेल्या पेन्शनर्स समिती समन्वय समितीच्या अधिवेशनानंतर पेन्शनर्सच्या विषयाला चालना मिळाली असल्याचा दावा समितीच्या वतीने करण्यात आला आहे. या अधिवेशनासाठी खासदार संपत, टी. के. इलगव्हाण, श्रीनिवास रेड्डी, ईटी. महम्मद बशीर, सदाशिव लोखंडे, राजू शेट्टी, रामदास आठवले यांनी अधिवेशनात जाऊन शिष्टमंडळाची भेट घेतली. या खासदारांनीदेखील अर्थमंत्रालयाशी चर्चा करण्याचे आश्वासन देत मागण्यांची माहिती जाणून घेतली.मंडी हाऊस ते संसदेपर्यंत काढण्यात आलेल्या मोर्चात पेन्शनर्स सहभागी झाले होते. त्यात प्रामुख्याने केरळ, आंध्र, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, कर्नाटक, एमपी, यूपी, तेलंगणा महाराष्टÑातील सेवानिवृत्त कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी झालेल्या मेळाव्यात दहा खासदारांच्या शिष्टमंडळाने पेन्शनर्सचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. यावेळी खासदार हेमंत गोडसे यांनी केंद्रीय मंत्र्यांच्या सचिवांशी शिष्टमंडळासह चर्चा केली. यावेळी सचिव मनू टेटीवाल यांनी पेन्शनर्सच्या मागण्यांसाठी सुमारे २२ हजार करोडचा अहवाल अर्थ मंत्रालयाकडे पाठविल्याचे शिष्टमंडळाला सांगितले. खासदार गोडसे यांनी अहवालाच्या प्रतीची मागणी यावेळी केली. शिष्टमंडळात सुधाकर गुजराथी, चेतन पणेर, नामदेव बोराडे, विष्णुपंत गायखे, के. एस. वारुंगसे, लक्ष्मण बोडके, शिवराम गायधनी, मधुकर मुठाळ, शंकरराव रोकडे, भाऊसाहेब आडके यांचा समावेश होता.

टॅग्स :NashikनाशिकGrandfather staleदादा भुसे