शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मिरजकर फसवणुकीतील संशयितांच्या अटकपूर्व जामीनावर आज सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 13:28 IST

नाशिक : आर्थिक गुंतवूणक व सोने तारणावर दरमहा एक ते दीड टक्के परतावा देण्याचे अमिष दाखवून शेकडो गुंतवूणकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या मिरजकर सराफ व त्रिशा जेम्सच्या संचालकांनी अटकपुर्व जामीनासाठी जिल्हा न्यायालयात धाव घेतली आहे़ जिल्हा व सत्र न्यायाधीश पी़आऱदेशमुख यांच्या न्यायालयात आज या जामीन अर्जावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे़ दरम्यान, या निर्णयाकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे़

ठळक मुद्दे२५० तक्रारदारांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे जबाब फसवणूकीची रक्कम दहा कोटी रूपयांपर्यत

नाशिक : आर्थिक गुंतवूणक व सोने तारणावर दरमहा एक ते दीड टक्के परतावा देण्याचे अमिष दाखवून शेकडो गुंतवूणकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या मिरजकर सराफ व त्रिशा जेम्सच्या संचालकांनी अटकपुर्व जामीनासाठी जिल्हा न्यायालयात धाव घेतली आहे़ जिल्हा व सत्र न्यायाधीश पी़आऱदेशमुख यांच्या न्यायालयात आज या जामीन अर्जावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे़ दरम्यान, या निर्णयाकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे़

एमपीआयडी कायद्यान्वये गुन्हा दाखल असलेल्या मिरजकर सराफ गुंतवणूकदार फसवणूक प्रकरणात तक्रारदारांची संख्या वाढते आहे़ आतापर्यंत २५० तक्रारदारांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे जबाब नोंदविले असून फसवणूकीची रक्कम दहा कोटी रूपयांपर्यत पोहोचल्याचीमाहिती पोलीस सूत्रांनी दिली़ या गुन्ह्यामधील फरार संशयितांपैकी आशितोष चंद्रात्रे यास पोलिसांनी अटक केली तर उर्वरीत संशयित महेश मिरजकर, सुरेश भास्कर, भरत सोनवणे, विशाल नगरकर, विजयदिप पवार, प्राजक्ता कुलकर्णी व किर्ती हर्षल नाईक यांनी अ‍ॅड़ एम. वाय. काळे यांच्यामार्फत तर संशयित श्रेयस आढावतर्फे अ‍ॅड. आर. आर. परासाते यांनी तात्पुरता अटकपूर्व जामीन अर्ज सादर केला होता. मात्र, न्यायाधीश देशमुख यांनी या सर्वांचा तात्पुरता अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावत अंतिम निर्णयासाठी ४ आॅगस्ट ही तारीख दिली होती़

या प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या आशितोष चंद्रात्रे यास न्यायालयाने सोमवार (दि़६) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे़ त्याने आपण पेढीतील कामगार असल्याचे स्पष्ट केले असले तरी तो मिरजकर कुटुंबियांचा जवळचा नातेवाईक असल्याचे वृत्त आहे़ दरम्यान, गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करून अटकपुर्व जामीनासाठी प्रयत्न करणा-यांचा अटकेचा फैसला आज होणार आहे़ 

 

टॅग्स :Nashikनाशिकjewelleryदागिनेfraudधोकेबाजी