शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बाळा’चे बदललेले रक्त बाईचे की आईचे? चाैकशी समितीने सादर केलेल्या अहवालाने खळबळ
2
पाकच्या मदतीसाठी चीनने उभारले बंकर; नियंत्रण रेषेलगत कम्युनिकेशन टॉवरही बांधले!
3
सेन्सरच्या त्रुटींमुळे दिल्लीत ५२° तापमानाचा ‘विक्रम’; हवामान विभाग म्हणे- पारा ४६.८° सेल्सिअसच
4
१८ वर्षांनी राहु शनी नक्षत्रात गोचर: ७ राशींना लॉटरी, शेअर बाजारात फायदा; प्रमोशन, धनलाभ योग!
5
तुमची बर्थडेट ‘या’ ३ पैकी आहे? जून महिन्यात ठरतील लकी, लाभेल सुख-समृद्धी, पद-पैसा वृद्धी!
6
वीकएण्डचा वाजणार बोऱ्या! मध्य रेल्वेवर उद्यापासून तीन दिवस जम्बो ब्लॉक, ९३० फेऱ्या रद्द
7
मनुस्मृती दहन करताना आमदार आव्हाड यांनी फाडला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो
8
कीर्ती व्यास हत्येप्रकरणी दोघांना जन्मठेप; अत्यंत थंड डोक्याने कृत्य केल्याचा वकिलांचा युक्तिवाद
9
Porsche Car Accident: 'बाळा'च्या ब्लड सँपलची ससून रुग्णालयात अदलाबदल; ते खासगी इसम कोण?
10
सचिन वाझेच्या तुरुंगाबाहेर पडण्याबाबतच्या अर्जावर उत्तर द्या; उच्च न्यायालयाचे सीबीआयला निर्देश
11
सरकारी कर्मचारी भ्रष्ट म्हणणे तक्रारदाराला भाेवले; कारवाई रद्द करण्यास उच्च न्यायालयाचा नकार
12
राधानगरीतील ८४ गावांत वाढणार इको टुरिझम; MSRDCकडून विकास आराखड्याचे काम सुरू
13
नार्को टेस्ट करण्याची मागणी; दमानियांचे आव्हान अजित पवारांनी स्वीकारले, मात्र ठेवली 'ही' एक अट!
14
27 हजार किलो स्फोटकांचा वापर; अवघ्या 6 महिन्यात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा बोगदा तयार
15
सुसंस्कृत घरातल्या स्त्रियांबाबत ही भाषा?; राष्ट्रवादीच्या नेत्याच्या वक्तव्याने दमानियांचा संताप, अजितदादांना म्हणाल्या...
16
Pune Porsche case: ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळेंना पाठवले तत्काळ सक्तीच्या रजेवर
17
९३० लोकल फेऱ्या रद्द, प्रवाशांचे अतोनात हाल होणार; ३ दिवस जम्बो ब्लॉक
18
"कोण आहेत मणिशंकर अय्यर, आमचा संबंध नाही", 'त्या' वक्तव्यामुळे काँग्रेसने हात झटकले...
19
सोशल मीडियावर रंगला नवा वाद; 'All Eyes on Rafah' आहे तरी काय? जाणून घ्या...
20
"तब्येत बरी नसती तर…’’ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दाव्याला नवीन पटनाईक यांनी दिलं असं प्रत्युत्तर

आरोग्य विद्यापीठाचा  सोमवारीपदवीप्रदान सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2018 5:50 PM

नाशिक :महाराष्ट्र  आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा आठरावा दीक्षांत सोहळा सोमवार, दि. १० रोजी विद्यापीठाच्या शिक्षक प्रबोधिनी यथे सकाळी ११ वाजता ...

नाशिक :महाराष्ट्र  आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा आठरावा दीक्षांत सोहळा सोमवार, दि. १० रोजी विद्यापीठाच्या शिक्षक प्रबोधिनी यथे सकाळी ११ वाजता होणार आहे.या समारंभास वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन अध्यक्षस्थानी, तर प्रमुख पाहुणे म्हणून दिल्ली येथील भारतीय दंत परिषदेचे अध्यक्ष दिवेंदू मझुमदार, आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजन कोटेचा व भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषदेचे अध्यक्ष वैद्य जयंत देवपुजारी, कुलगुरू दिलीप म्हैसेकर, प्रति-कुलगुरू डॉ. मोहन खामगावकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.विविध विद्याशाखांमधील गुणवत्ता प्राप्त केलेल्या ५९ सुवर्णपदके मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रदान केली जाणार आहेत. याबरोबरच संशोधन पूर्ण केलेल्या १६ विद्यार्थ्यांना पीएच.डी. प्रदान करण्यात येणार आहे. या दीक्षांत समारंभासाठी शैक्षणिक वर्ष २०१७-२०१८ मध्ये घेतलेल्या पदविका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या व आंतरवासीयता पूर्ण केलेल्या आरोग्य शाखांच्या एकूण ८,४६६ विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान केल्या जाणार आहेत.आधुनिक वैद्यक विद्याशाखा पदवीचे ३६८, दंत विद्याशाखा पदवीचे १६९५, आयुर्वेद विद्याशाखेचे ५९६, युनानी विद्याशाखेचे ४८, होमिओपॅथी विद्याशाखेचे ९११, पदव्युत्तर विद्याशाखेमध्ये एमडी मेडिकल विद्याशाखेचे ९२६, एम.एस. मेडिकल विद्याशखेचे ४४६, पी. जी. डिप्लोमा विद्याशाखेचे २६२, डी. एम. विद्याशाखेचे ५१, एमसीएच विद्या शाखेचे ५४, एम.एस्सी मेडिकल बायोकेमिस्ट्री विद्याशाखेचे ०३, एमीबीए विद्याशाखेचे ४१, एमपीएच विद्याशाखेचे ०७, पदव्युत्तर दंत व पॅरामेडिकल विद्याशाखेचे ७२९, पदव्युत्तर आयुर्वेद व युनानी विद्याशाखेचे २३४, पदव्युत्तर होमिओपॅथी विद्याशाखेचे ५६, पदव्युत्तर तत्सम विद्याशाखेचे ३२५, पदवी तत्सम विद्याशाखेचे १७१४, तसेच ५९ सुवर्णपदक प्रदान करण्यात येणार आहेत.दीक्षांत समारंभात आरोग्य विज्ञान पदवी आणि पदव्युत्तरच्या विविध विद्याशाखांमधील अंतिम वर्षाच्या परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण विविध विषयांमध्ये नैपुण्य प्राप्त केलेल्यांना सुवर्णपदके प्रदान केली जाणार आहेत. वैद्यकीय विद्याशाखांमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण विद्यार्थ्यांस मेरीट स्कॉलरशीप अवॉर्ड रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार आहे. या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी केले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकuniversityविद्यापीठ