शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणाबाबत सरकारने ठोस भूमिका घेणे अपेक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 19:22 IST

नाशिक : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्य सरकारने आपली ठोस भूमिका स्पष्ट केली पाहिजे. केवळ प्रसिद्धीसाठीची विधाने करणे सरकारला शोभणारे नाही, असे प्रतिपादन भारिप बहुजन महासंघाचे राष्टÑीय नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. सरकार नेमके काय करणार आहे याची काहीही स्पष्टता नसल्याने आपण मुख्यमंत्र्यांनी बोलाविलेल्या बैठकीस जाणार नसल्याचेही आंबेडकर यांनी सांगितले.

ठळक मुद्देप्रकाश आंबेडकर : मराठा आरक्षणाबाबत निव्वळ विधाने मराठा आमदारांनी दिलेले राजीनामे हे निव्वळ नौटंकी

नाशिक : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्य सरकारने आपली ठोस भूमिका स्पष्ट केली पाहिजे. केवळ प्रसिद्धीसाठीची विधाने करणे सरकारला शोभणारे नाही, असे प्रतिपादन भारिप बहुजन महासंघाचे राष्टÑीय नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. सरकार नेमके काय करणार आहे याची काहीही स्पष्टता नसल्याने आपण मुख्यमंत्र्यांनी बोलाविलेल्या बैठकीस जाणार नसल्याचेही आंबेडकर यांनी सांगितले.वंचित बहुजन आघाडीच्या मेळाव्यासाठी नाशिकमध्ये आलेल्या अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यात गाजत असलेल्या मराठा आरक्षणासंदर्भात त्यांना विचारले असता मराठा आरक्षणाकडे सकार गांभीर्याने पाहत नसल्याने त्यांची भूमिका कळत नसल्याचे म्हटले. सरकारने अगोदर आपली भूमिका जाहीर केली पाहिजे. आरक्षण देण्याची तयारी असल्याचे सरकार म्हणत असले तरी हे केवळ सवंग प्रसिद्धीसाठी केलेले विधान असल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला.कोणत्या निकषावर आरक्षण देता येऊ शकते, याबाबत मराठा कार्यकर्त्यांचा विश्वास हा मराठा नेत्यांवर आहे. त्यामुळे इतर कुणी याबाबत स्पष्ट भूमिका मांडत नाही. कुणी अशी भूमिका मांडली तर त्यावर लागलीच ‘रियॅक्शन’ येऊ शकेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सायमन कमिशन समोर मांडलेला ‘मागासलेपण’ यावरूनच पुढे आरक्षणाची रेघ ओढता येऊ शकते, असा बचावात्मक पवित्रा घेत आंबेडकर यांनी आपली भूमिका मांडली.मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा आमदारांनी दिलेले राजीनामे हे निव्वळ नौटंकी आहे, अशा शब्दात राजीनामा नाट्यावर टीका केली तर आर्थिक निकषावर आरक्षण दिले पाहिजे असे म्हणणाऱ्या राज ठाकरे यांना आपण फारसे महत्त्व देत नसल्याचेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.--इन्फो--शरद पवार यांचे विधान खूष करण्यासाठीराष्टÑवादीचे नेते शरद पवार यांनी घटनेत दुरुस्ती झाली पाहिजे, अशी भूमिका मांडली आहे. परंतु घटनेत नेमकी कोणती दुरुस्ती करावी, हे त्यांनी स्पष्ट केले असते तर त्यावर चर्चा होऊ शकली असती अन्यथा मराठा समाजाला खूष करण्यासाठीचे विधान एवढाच त्याचा अर्थ काढता येऊ शकतो, असा टोलाही प्रकाश आंबेडकर यांनी लगावला.

टॅग्स :NashikनाशिकPoliticsराजकारण