शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतींकडे पथदिव्यांच्या वीजदेयकापोटी १६२ कोटी रुपये थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 18:54 IST

नाशिक परिमंडळात पथदिव्यांच्या वीजदेयकापोटी ग्रामपंचायतींकडे चार हजार ८७८ वीजजोडण्यांचे १६२ कोटी रुपये थकीत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थानी अखंडित वीजसेवेसाठी शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून प्राप्त निर्देशानुसार त्यांच्या स्वनिधी, चौदावा वित्त आयोग किंवा इतर निधीतून पथदीपांचे वीजदेयके भरावे, असे आवाहन मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी केले आहे.

ठळक मुद्देमहावितरण पुढे प्रश्न : ग्रामविकास विभागाकडून बिल भरण्याचे आवाहनचार हजार ८७८ वीजजोडण्यांचे १६२ कोटी रुपये थकीत

नाशिक : नाशिक परिमंडळात पथदिव्यांच्या वीजदेयकापोटी ग्रामपंचायतींकडे चार हजार ८७८ वीजजोडण्यांचे १६२ कोटी रुपये थकीत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थानी अखंडित वीजसेवेसाठी शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून प्राप्त निर्देशानुसार त्यांच्या स्वनिधी, चौदावा वित्त आयोग किंवा इतर निधीतून पथदीपांचे वीजदेयके भरावे, असे आवाहन मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी केले आहे.शासनाच्या ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना फेब्रुवारी अखेरीस एका पत्रान्वये राज्यातील ग्रामपंचायतींच्या हद्दीतील रस्त्यांवरील विजेच्या दिव्यांच्या थकीत देयकांबाबत निर्देश दिले आहेत. राज्यातील ग्रामपंचायतींच्या हद्दीतील रस्त्यांवरील दिव्यांची बरीचशी वीजबिले थकीत असल्याचे निदर्शनास आले आहे. सदर थकीत बिलांसाठी महावितरण विद्युत कंपनी वीजजोडणी खंडित करण्याची शक्यता आहे. त्यामुळे गैरसोय टाळण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या स्वनिधीतून, चौदावा वित्त आयोग किंवा इतर निधीतून ही थकीत बिले भागविण्यात यावी व त्याबाबतची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत शासनास पाठविण्यात यावी, असे या पत्रात निर्देशित करण्यात आले आहे.नाशिक मंडळातील ग्रामपंचायतीकडे पथदीपांच्या वीजदेयकापोटी एक हजार ७२० वीजजोडण्यांचे ५३ कोटी ७८ लाख रुपये थकीत आहेत. त्यात सर्वाधिक नाशिक ग्रामीण विभागात ग्रामपंचायत पथदिव्यांच्या ९९८ वीजजोडण्यांचे ३८ कोटी ७१ लाख रुपये, नाशिक शहर विभाग-दोनमध्ये ३८४ वीजजोडण्यांचे दोन कोटी २२ लाख रुपये, चांदवड विभागात ३३८ वीजजोडण्यांचे १२ कोटी ८४ लाख रुपये थकीत वीजदेयके आहेत.--इन्फो---मालेगाव मंडळातील थकबाकीमालेगाव मंडळातील ग्रामपंचायतींकडे पथदिव्यांच्या वीजदेयकापोटी एक हजार २१ वीजजोडण्यांचे २३ कोटी ३२ लाख रुपये थकीत आहेत. त्यात सर्वाधिक कळवण विभागात ग्रामपंचायत पथदिव्यांच्या २५६ वीजजोडण्यांचे सात कोटी २६ लाख रुपये, मनमाड विभागात २७१ वीजजोडण्यांचे पाच कोटी ७९ लाख रुपये, मालेगाव विभागात २६६ वीजजोडण्यांचे पाच कोटी ५९ लाख रुपये, सटाणा विभागात २२८ वीजजोडण्यांचे चार कोटी ७९ लाख रुपये चालू व थकीत वीजदेयके आहेत.

टॅग्स :Nashikनाशिकmahavitaranमहावितरण