शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील वीजपुरवठा वारंवार विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 14:45 IST

राज्यात सर्वत्र सुरळीत वीजपुरवठा सुरू असून कुठेही भारनियमन नसल्याचा दावा महावितरणकडून करण्यात आला असला तरी नाशिक शहरात मात्र दररोज वीजपुरवठा विस्कळीत होत आहे. वीजपुरवठा खंडीत होण्यामागचे कारण महावितरणच्या कोणत्याही अधिकाऱ्याला सांगता येत नसल्याने ग्राहक संभ्रमात असून महावितरणकडून छुपे भारनियमन राबविले जात असल्याची शंका उपस्थित केली जात आहे.

ठळक मुद्देग्राहकांच्या तक्रारी : भारनियमन नसल्याचा दावा वाढत्या उन्हामुळे घरोघरी पंखे आणि कुलर्सचा वापर

नाशिक : राज्यात सर्वत्र सुरळीत वीजपुरवठा सुरू असून कुठेही भारनियमन नसल्याचा दावा महावितरणकडून करण्यात आला असला तरी नाशिक शहरात मात्र दररोज वीजपुरवठा विस्कळीत होत आहे. वीजपुरवठा खंडीत होण्यामागचे कारण महावितरणच्या कोणत्याही अधिकाऱ्याला सांगता येत नसल्याने ग्राहक संभ्रमात असून महावितरणकडून छुपे भारनियमन राबविले जात असल्याची शंका उपस्थित केली जात आहे.नाशिकचा पारा चाळीस अंशापर्यंत पोहचल्याने कडाक्याच्या उन्हामुळे नाशिककर घामाघुम झालेले आहेत. दिवसेंदिवस उन्हाचा चटका वाढत असल्यामुळे मे मंिहन्यातील ऊन्हाळा नागरिकांना आताच असह्य होऊ लागला आहे. वाढत्या उन्हामुळे घरोघरी पंखे आणि कुलर्सचा वापर मोठ्या प्रमाणात करावा लागत आहे. अशा परिस्थितीत शहरात दररोज कुठे ना कुठे वीजपुरवठा गायब होत असल्यामुळे नाशिककरांना त्रास सहन करावा लागत आहे. विशेषता: गंगापूररोड, शरणपूररोड,महात्मानगर, सातपूर, सिडको तसेच पंचवटीच्या काही परिसरात वीजपुरवठा खंडीत होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. नाशिकरोड परिसरातही अनेक भागात काहीवेळ वीजपुरवठा खंडीत होऊन पुर्ववत होत असल्याच्या तक्रारी आहेत. वीजेचा लपंडाव ही आता नित्याचीच बाब झाल्याने नेमकी तांत्रिक अडचण काय आहे याविषयी ग्राहक संभ्रमावस्थेत आहेत.खंडीत वीजपुरवठ्याचा हा प्रकार रहिवासी आणि व्यावसायिक क्षेत्रातही अलिकडे वाढीस लागला आहे. या संदर्भात वीज कर्मचाºयांना विचारणा केल्यानंतर त्यांना याबाबत पुरेशी माहिती नसते. टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर मुख्य कारण कळण्यासाठी ग्राहमाकला किमान तासभर तरी वाट पहावी लागते. टोल फ्री यंत्रणा संपुर्णपणे तांत्रिक असून संबंधित व्यक्तीकडून ग्राहकाला नेमके कारण कधीच सांगितले जात नाही किंबहूना या यंत्रणेला स्थानिक वीजपुरवठ्याच्या बाबतीतल कोणतेही बारकावे माहित नसतात. केवळ थोड्याच वेळात वीजपुरवठा सुरळीत होईल असे सांगितले जाते. वास्तविक ही संपुर्ण यंत्रणा वेळकाढूपणाची आणि परावलंबी असून यामुळे ग्राहकांचे कोणतेही हित साधले गेले नसल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :Power Shutdownभारनियमनmahavitaranमहावितरण