शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

महारष्ट्र -सौराष्ट्र संघाचे नाशिकमध्ये आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 17:29 IST

नाशिक : बीसीसीआयच्यावतीने घेण्यात येत असलेलेया रणजी स्पर्धेतील महारष्ट्रतील पाच सामन्यांपैकी एक सामना शुक्रवार दि. १४ पासून नाशिकच्या हुतात्मा ...

ठळक मुद्देरणजी क्रिकेट : दोन्ही संघाचा मैदानावर सराव

नाशिक: बीसीसीआयच्यावतीने घेण्यात येत असलेलेया रणजी स्पर्धेतील महारष्ट्रतील पाच सामन्यांपैकी एक सामना शुक्रवार दि. १४ पासून नाशिकच्या हुतात्मा अनंत कान्हेरे (गोल्फ क्लब) मैदानावर होणार आहे. महारष्ट्र विरूद्ध सौराष्ट्र  आमने सामने असून दोन्ही संघाने नाशिकमध्ये आगमन झाले आहे. महारष्ट्रचा संघ मंगळवारी दाखल झाला तर बुधवारी सकाळी सौराष्ट्र  संघाचे आगमन झाले. दोन्ही संघांनी सरावाला सुरूवात केली आहे.शुक्रवार दि. १४ पासून गोल्फ क्लब मैदानावर होणाऱ्या महारष्ट्रविरुद्ध सौराष्ट्र  रणजी क्रिकेट स्पर्धेसाठी महारष्ट्रचा संघ जाहीर करण्यात आला असून, संघात केदार जाधवचा समावेश करण्यात आला आहे. महारष्ट्रचा संघ अंकित बावणे (कर्णधार), स्वप्नील गुगळे, जय पांडे, राहुल त्रिपाठी (उपकर्णधार), चिराग खुराणा, नौशाद शेख, रोहित मोटवाणी (यष्टीरक्षक) अक्षय पालेकर, सत्यजित बच्छाव, अनुपम संकलेचा, समद फल्लाह, मंदार भंडारी, अक्षय दरेकर, निखिल धुमाळ, असा संघ जाहीर करण्यात आला आहे.सौराष्ट्राने देखील आपल्या संघाची घोषणा केलेली आहे. संघाची मदार असलेल्या जयदेव उनाडकट याचा संघात समावेश आहे. संघात अर्पित वासवधा, जयदेव उनाडकट, शेल्डन जॉन्सन, स्रेल पटेल, हार्विक देसाई, प्रेरक मंकड, चिराग जानी, अवी बरोट, किशन परमार, धर्मेन्द्र जडेजा, हार्दीक राठोड, वंदीत जीवराजानी, कमलेश मकवाना, जय चव्हाण, चेतन साकरीया, विश्वराज जडेजा यांचा समावेश आहे.नाशिकच्या मैदानावर होणारा हा दहावा रणजी सामना आहे. यंदा बीसीसीआयच्या नियमांमुळे सामना आयोजन ते सामना संपेपर्यंत अनेक काटेकोर नियमांची अंमलबजावणी करावी लागणार आहे. यंदाच्या मोसमात झालेल्या रणजी सामन्यात महारष्ट्रने चार गुण कमाविले आहेत व ते ग्रुप ‘ए’ मध्ये सातव्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे सौराष्ट्र ने एका विजयाची नोंद करीत १३ गुण मिळविले आहे. या गटात सौराष्टÑ तिसºया क्रमांकावर आहे.

टॅग्स :NashikनाशिकCricket Bettingक्रिकेट सट्टेबाजी