शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिल सदस्यपदासाठी 28 मार्चला मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 08:35 IST

नाशिक : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तब्बल आठ वर्षांनंतर होणा-या वकिलांच्या महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलच्या २५ जागांसाठी बुधवारी (दि़२८ मार्च) दोन्ही राज्यांमधील न्यायालयात मतदान होणार आहे़ या मतदानासाठी महाराष्ट्र व गोवा या दोन्ही राज्यातील ३११ जिल्हा व तालुका न्यायालयांमध्ये मतदानाची तयारी करण्यात आली आहे़ या निवडणुकीसाठी १६३ वकील उमेदवार रिंगणात असून त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील नऊ वकिलांचा समावेश आहे़

ठळक मुद्देकौन्सिलच्या २५ जागा : एकूण १६३ उमेदवार नाशिक जिल्ह्यातील ९ वकील रिंगणात

नाशिक : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तब्बल आठ वर्षांनंतर होणा-या वकिलांच्या महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलच्या २५ जागांसाठी बुधवारी (दि़२८मार्च)  )दोन्ही राज्यांमधील न्यायालयात मतदान होणार आहे़ या मतदानासाठी महाराष्ट्र व गोवा या दोन्ही राज्यातील ३११ जिल्हा व तालुका न्यायालयांमध्ये मतदानाची तयारी करण्यात आली आहे़ या निवडणुकीसाठी १६३ वकील उमेदवार रिंगणात असून त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील नऊ वकिलांचा समावेश आहे़

महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिल सदस्यपदाच्या या निवडणुकीत कौन्सिलचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रीय मसुदा समितीचे निमंत्रक अ‍ॅड़ जयंत जायभावे, माजी सदस्य अ‍ॅड़ अविनाश भिडे, नाशिक बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अ‍ॅड़ दिलीप वनारसे, आॅल इंडिया वुमेन लॉयर्स संघटनेच्या माजी अध्यक्ष अ‍ॅड. इंद्रायणी पटणी, अ‍ॅड़ बाळासाहेब आडके, अ‍ॅड़ विवेकानंद जगदाळे, अ‍ॅड़ एस़यू़ सय्यद, अ‍ॅड़ लीलाधर जाधव, अ‍ॅड़ शालिग्राम हे नऊ जण निवडणुकीच्या रिंगणात आहेत़

महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलसाठी २०१० मध्ये निवडणूक झाली होती़ मात्र, सदस्यपदी निवडून आलेले सदस्यांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर काही कारणास्तव निवडणूक पुढे-पुढे ढकलली गेली़ अखेर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर तब्बल आठ वर्षांनी ही निवडणूक घेतली जात आहे़ महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यातील १ लाख १२ हजार वकील मतदार यासाठी मतदान करणार असून, त्यापैकी ४ हजार ५०० वकील मतदान हे नाशिक जिल्ह्यातील आहेत़ प्रत्येक वकील मतदारास कमीत कमी ५ तर जास्तीत जास्त २५ मते देण्याचा अधिकार आहे़

या निवडणुकीद्वारे कौन्सिलचे २५ सदस्य निवडले जाणार असून त्यातूनच अध्यक्ष, उपाध्यक्ष व पदाधिका-यांची निवड केली जाते़ दोन राज्यातील वकिलांचे प्रतिनिधित्व करणा-या कौन्सिलच्या सदस्यपदी निवडून येण्यासाठी अनेक मातब्बरांनी साधारणत: वर्षभरापासून तयारी सुरू केली आहे़चाळीस टक्के मतदार राहणार वंचितसुमारे पावणे दोन लाखांहून अधिक नोंदणीकृत वकील महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यांमध्ये आहे़ मात्र, वकिलांच्या सनद पडताळणीसाठी राबविण्यात आलेली प्रक्रिया केवळ एक लाख १२ हजार वकिलांनीच पूर्ण केली़ त्यामुळे सुमारे ६०-६५ हजार वकील या मतदानापासून वंचित राहणार आहेत़

टॅग्स :NashikनाशिकadvocateवकिलElectionनिवडणूक