शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

दापोली पंचायत समिती गिरविणार नाशिक जिल्हा परिषदेचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 19:01 IST

नाशिक : मंजूर कामे, त्यांच्या निविदा आणि त्यासाठी देण्यात आलेले कार्यारंभ आदेश आदींसह महत्त्वाची माहिती सर्वसामान्यांसाठी संकेतस्थळावर खुली करण्याच्या ...

ठळक मुद्दे जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित

नाशिक : मंजूर कामे, त्यांच्या निविदा आणि त्यासाठी देण्यात आलेले कार्यारंभ आदेश आदींसह महत्त्वाची माहिती सर्वसामान्यांसाठी संकेतस्थळावर खुली करण्याच्या नाशिक जिल्हा परिषदेचा उपक्रम दापोलीतही राबविण्यात येण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेच्या उपक्रमांची माहिती घेण्यासाठी आलेल्या दापोलीच्या शिष्टमंडळाने पारदर्शक कारभारासाठी कार्यारंभाची माहिती खुली करण्याच्या नाशिकच्या या उपक्रमाचे चांगलेच कौतुक केले आहे.नाशिक जिल्हा परिषदेच्या कामकाजाची माहिती घेण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली पंचायत समिती अंतर्गत महिला लोकप्रतिनिधींनी जिल्हा परिषदेस भेट देऊन विविध उपक्र मांची माहिती घेतली. यावेळी त्यांनी जिल्हा परिषदेकडून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची आणि सुरू असलेल्या कामांची माहिती घेत कुपोषण आणि घरकुलमध्ये जिल्हा परिषदेने केलेल्या कामाविषयी अधिक माहिती जाणून घेतली. या अभ्यास दौºयात त्यांनी जिल्हा परिषदेच्या विविध विभागांमध्ये सुरू असलेले आणि कामात साधलेल्या प्रगतीची माहिती घेतली. राज्यात विविध उपक्रमांमध्ये अग्रेसर काम करणाºया जिल्हा परिषदेच्या कामाचे नियोजन यावेळी त्यांनी जाणून घेतली.सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी यांनी जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या कुपोषण निर्मूलन अभियान, घरकुल योजना, मानव संपदा, स्वच्छ सर्वेक्षण आदी उपक्र मांबाबत माहिती दिली. जिल्हा परिषदेमार्फत संकेतस्थळावर नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या कार्यारंभ आदेशाच्या उपक्र माबाबत सर्व सदस्यांनी जिल्हा परिषदेचे कौतुक करून रत्नागिरी जिल्ह्यातदेखील सदरचा उपक्र म राबविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगितले. दापोली तालुक्यात राबविण्यात येणाºया योजनांबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. यावेळी दापोली पंचायत समितीच्या सहायक गटविकास अधिकारी सुवर्णा बागल यांच्यासह, जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिकnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद