शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

‘फोल्डिंग सायकल’सोबत नाशिककरांची ‘सेल्फी’

By admin | Updated: March 9, 2017 16:12 IST

कुतूहल: पंचवटीमधील सायकलप्रेमीने जोपासला छंद

नाशिक : ‘एक व्यक्ती सायकल चालवित येते अन् मध्येच त्या सायकलची घडी करून चक्क बॅगेसारखे घेऊन एका भल्यामोठ्या इमारतीत शिरते’ असा व्हिडिओ अनेकांनी सोशल मीडियावर बघितला असेल. पण जर असेच चित्र प्रत्यक्ष आपल्याला बघावयास मिळाले तर ...! होय, अशीच सायकल नाशिकच्या रस्त्यावर सध्या फिरत आहे. ‘सेल्फी विथ फोल्डिंग सायकल’चा मोह झाल्याशिवाय राहत नाही. पंचवटीच्या एका सायकलप्रेमी युवकाची ही घडी होणारी सायकल सध्या शहरात आकर्षणाचा विषय ठरत आहे.जुन्या पारंपरिक सायकलपासून तर आजच्या आधुनिक गिअरची सायकल सर्वांनाच परिचित आहे; मात्र शहरातील पंचवटी भागातील सायकलप्रेमीने चक्क घडी होणारी सायकल परदेशातून खरेदी करत आपला छंद जोपासला आहे. सायकलप्रेमींचे शहर म्हणून राज्यात ओळख मिळविण्याचा प्रयत्न नाशिक शहराने सुरू केला आहे. कृषिनगरमध्ये सायकल सर्कलचे वाहतूक बेटही बघावयास मिळते. आबालवृद्ध सकाळ-संध्याकाळ शहराच्या विविध भागांमधून सायकलवर फेरफटका मारताना दिसून येतात. स्वत:चे आरोग्य निरोगी ठेवण्याबरोबरच शहराचे पर्यावरणही जपण्यासाठी सायकलप्रेमी प्रयत्नशील आहे. असाच प्रयत्न पंचवटीच्या सरदार चौकात राहणाऱ्या विवेक रोजेकर या तरुणाने वजनाला हलकी व घरात सहजरीत्या कमी जागेत ठेवता येईल, अशी घडी होणारी सायकल खरेदी के ली आहे. या सायकलवरून रोजेकर सकाळ - संध्याकाळ फेरफटका मारतात. दिवसभरातून सुमारे २५ किलोमीटरचा प्रवास हा छंदवेडा सायकलप्रेमी करतो. मागील दीड ते दोन वर्षांपासून या छंदवेड्याने सायकल चालविण्याचा छंद निष्ठेने जोपासला असून, काही महिन्यांपूर्वीच फोल्डिंग सायकलवरून हा युवक सायकलिंग करत आहे.