शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

नाशिककरांच्या पसंतीचे ‘सोमेश्वर’चे पर्यटन धोक्याचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 00:18 IST

शहरापासून अवघ्या आठ ते दहा किलोमीटर अंतरावर गंगापूर गावाच्या शिवारात असलेल्या बालाजी मंदिरालगत सोमेश्वर धबधबा सध्या खळाळून वाहत आहे. नाशिककरांच्या पसंतीचे जवळचे ‘डेस्टिनेशन’ असलेला सोमेश्वर धबधब्याचा परिसर वर्षानुवर्षांपासून असुरक्षितच राहिला आहे.

नाशिक : शहरापासून अवघ्या आठ ते दहा किलोमीटर अंतरावर गंगापूर गावाच्या शिवारात असलेल्या बालाजी मंदिरालगत सोमेश्वर धबधबा सध्या खळाळून वाहत आहे. नाशिककरांच्या पसंतीचे जवळचे ‘डेस्टिनेशन’ असलेला सोमेश्वर धबधब्याचा परिसर वर्षानुवर्षांपासून असुरक्षितच राहिला आहे. धबधब्याभोवती संरक्षक कुंपण उभारण्याची गरज आहे. फोटोसेशनसाठी पर्यटक धबधब्याजवळ जाण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे.  सोमेश्वर धबधब्याच्या परिसरात असलेल्या गोदापात्रातील खडकांवर उभे राहून पर्यटक फोटो काढताना दिसतात. कारण पायवाटेपासून थेट गोदापात्रात जाता येते. येथे कु ठल्याही प्रकारचे संरक्षण कुंपण उभारण्यात महापालिकेला यश आलेले नाही. सोमेश्वर धबधब्याच्या परिसरात विकासकामांची खरी गरज आहे, तरच या पर्यटनस्थळाचा नावलौकिक वाढेल.  या धबधब्याच्या आवारात बालाजी मंदिराचा परिसर वगळता महापालिकेचे स्वच्छतागृहही उपलब्ध नाही. त्यामुळे आलेल्या पर्यटकांची मोठी कुचंबणा होते. याचा सर्वाधिक त्रास महिलावर्गाला होतो. येथील जवळच असलेल्या गोदावरी परिचय उद्यानात अद्ययावत व पाण्याच्या मुबलक व्यवस्थेसह प्रसाधनगृह उभारण्याची मागणी होत आहे.‘नो-सेल्फी’ सूचना फलकांचा अभावसोमेश्वर धबधबा परिसर धोकादायक बनत चालला आहे. येथील हॉटेलच्या मागील बाजूने पर्यटक उंचीवरून खडकावर उभे राहत सेल्फीची हौस भागवितात. यावेळी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. उंचीवरून तोल गेल्यास किंवा पाय घसरल्यास थेट नदीपात्रात कोसळण्याचा धोका संभवतो. यामुळे पर्यटकांनी अतिउत्साह व बेभानपणा टाळणे गरजेचे आहे. महापालिकेच्या वतीने गोदापात्राच्या परिसरात ‘नो सेल्फी’चे सूचनाफलक लावले आहेत; मात्र दूधसागर धबधब्याच्या परिसरात कोठेही ‘नो-सेल्फी’चे सूचनाफलक नजरेस पडत नाहीत.

टॅग्स :someshwar waterfallसोमेश्वर धबधबाtourismपर्यटन