शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

एकात्मतेसाठी धावले नाशिककर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 01:52 IST

: स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान, गृहमंत्री तथा लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व राष्ट्रीय एकता दिनानिमित्ताने राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यासाठी शहर पोलीस आयुक्तालयातर्फे ‘एकता दौड’चे आयोजन करण्यात आले होते.

नाशिक : स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान, गृहमंत्री तथा लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व राष्ट्रीय एकता दिनानिमित्ताने राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यासाठी शहर पोलीस आयुक्तालयातर्फे ‘एकता दौड’चे आयोजन करण्यात आले होते.  पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. छेरिंग दोरजे, महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या संचालक अश्वती दोरजे यांंंनी झेंडा दाखविल्यानंतर या दौडला प्रारंभ झाला़ राष्ट्रीय एकात्मतेसाठी झालेल्या या दौडमध्ये नाशिककर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़ नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने ग्रामीणमध्ये १८ ठिकाणी ही एकता दौड यशस्वीपणे झाली़  पोलीस आयुक्त डॉ़ रवींंद्र सिंगल यांनी राष्ट्रीय एकात्मतेसाठी सर्वांना एकत्र येण्याचे आवाहन केले़ एकता दौडला प्रारंभ होण्यापूर्वी कवायत मैदानावर उपस्थितांनी झुंबा डान्स केला़ या एकता दौडमध्ये सायकलिस्ट असोसिएशनसह सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी, महाराष्ट्र पोलीस अकादमीचे प्रशिक्षणार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनीही सहभागी झाले होते. महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे माजी शिक्षणाधिकारी नितीन उपासनी, आंतरराष्ट्रीय धावपटू नंदू उगले सहभागी झाले होते. सुयश हॉस्पिटलचे एक पथक वैद्यकीय सेवेसाठी सज्ज होते. कवायत मैदानापासून प्रारंभ झालेली एकता दौड, गंगापूर रोडमार्गे, विद्याविकास सर्कल, कॉलेजरोड, कॅनडा कॉर्नर, शरणपूर रोडमार्गे पुन्हा कवायत मैदानावर समारोप झाला. सहभागी धावपटूंना मेडल प्रदान करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी राष्ट्रीय एकात्मतेची शपथही घेतली.याप्रसंगी पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, श्रीकृष्ण कोकाटे, लक्ष्मीकांत पाटील, माधुरी कांगणे यांच्यासह शासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी उपस्थित होते.नागरिकांच्या हातात पोलीस उपक्रमांचे फलक नो हॉर्न डे, वाहतूक नियमांचे पालन, मै हूँ डॉन, व्यसनमुक्ती, महिला सक्षमीकरण असे शहर पोलीस आयुक्तालयामार्फत राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांचे फलक दौडमध्ये नागरिकांच्या हातामध्ये होते़ या दौडमध्ये सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी, महाराष्ट्र पोलीस अकादमीचे प्रशिक्षणार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच वयोवृद्धांपर्यंत सर्व गटातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

 

टॅग्स :PoliceपोलिसNashikनाशिक