शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पुणेकरांना मागे टाकत नाशिककर रांगेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 01:44 IST

उद्योग, व्यवसायासोबतच शिक्षणासारख्या विविध क्षेत्रांतही नाशिकपेक्षा एक पाऊल पुढे असलेल्या पुण्याला यंदाच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवून पुण्याला मागे टाकण्याची संधी साधण्यासाठी नाशिककर सोमवारी (दि.२९) सकाळपासून रांगेत उभे असल्याचे दिसून आले.

नाशिक : उद्योग, व्यवसायासोबतच शिक्षणासारख्या विविध क्षेत्रांतही नाशिकपेक्षा एक पाऊल पुढे असलेल्या पुण्याला यंदाच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवून पुण्याला मागे टाकण्याची संधी साधण्यासाठी नाशिककर सोमवारी (दि.२९) सकाळपासून रांगेत उभे असल्याचे दिसून आले. विविध संघटनांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘मतदानात पुण्याला मागे टाकण्याची हीच संधी’ असल्याच्या पोस्टमधून नाशिककरांना मतदानासाठी केलेल्या आवाहनाला मतदारांनी उत्स्फू र्त प्रतिसाद देत तासनतास रांगेत उभे राहून मतदान केले.पुण्यात यंदा पन्नास टक्क्यांच्या आत मतदान झाले असल्याने पुण्यातील सुशिक्षित मतदारांवर टीका होत असताना ‘पुण्यापेक्षा नको उणे’ असा विचार करून लोकशाहीचा महाउत्सव असलेल्या लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढून लोकशाही सक्षम व्हावी, यासाठी विविध संघटनांकडून जनजागृतीवर भर दिला होता. त्याला नाशिककरांनीही शहरातील विविध मतदान केंद्रावर प्रतिसाद देत सकाळपासून रांगा लावून मतदान केले.लोकसभा निवडणूक देशाचे भवितव्य ठरविणारी निवडणूक असतेच, परंतु पाच वर्षांसाठी काम करणारा लोकप्रतिनिधी कोण हवा याबाबतही मतदार आपला कौल देत असतात. मतदानाला गेलेच नाही तर नंतर सरकार किंवा निवडून येणाऱ्या खासदाराने कमी अधिक प्रमाणात कामे केली किंवा नाही तर त्याला जाब विचारण्यात काय अर्थ? असा प्रश्न करूनच विविध संघटना या प्रचार मोहिमेत सहभागी झाल्या आहेत. यात जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ‘व्होट कर नाशिककर’ ही मोहीम सुरू झाली असून, अनेक संघटनांनी फेसबुक, व्हॉट््स अ‍ॅप, टष्ट्वीटर आणि जाहीरपत्रकांद्वारे मतदानाचे कर्तव्य पार पाडा आवाहन केले.  तसेच मतदानानंतर संघटनांचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी आपले सेल्फीही सोशल मीडियावरही मतदारांना मतदानासाठी घराबाहेर पडण्याचे आवाहन केले. यात प्रामुख्याने नाशिक सिटीझन फोरम, महाराष्टÑ चेंबर आॅफ कॉमर्स, क्रेडाई, नरेडको, ट्रॅव्हल एजंट असोसिएशन, इंडियन मेडिकल असोसिएशन, इन्स्टिट्यूट आॅफ इंडियन इंटेनिअर डिझायनर, आर्किटेक्ट अ‍ॅँड इंजिनिअर असोसिएशन अशा अनेक संघटनांनी मतदारांना मतदानाचे आवाहन केले. तसेच महापालिकेच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांनीही मतदार जागृती फेºया काढून मतदानासाठी आवाहन केले होते.या मोहिमेत काही खासगी शाळांनीही सहभाग घेतला होता. यात अक्षर संस्कार फाउंडेशन, वाघ गुरुजी शाळा, मराठा हायस्कूल, मविप्र, नाएसो व नाशिप्र सारख्या शिक्षणसंस्थांच्या विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनीही मतदार जागृती अभियानात सहभाग घेऊन नाशिककरांना मतदान करण्याचे आवाहन केले होते.  या सर्व संघटनांच्या आवाहनाला नाशिककरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध मतदान केंद्रावर रांगा लावून मतदान केले. त्यामुळे मतदानाचा टक्का वाढला.

व्हीव्हीपॅटची उत्सुकतालोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेत यावर्षी पहिल्यांदाच व्हीव्हीपॅट यंत्राचा वापर करण्यात आला. या यंत्राविषयी सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध संघटनांनी जनजागृती केली होती. शिवाय विविध राजकीय पक्षांच्या राष्ट्रीय नेत्यांनीही मतदान केल्यानंतर व्हीव्हीपॅट यंत्रावर येणाºया प्रिंटवर खात्री करून घेण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे मतदारांनी मतदान केल्यानंतर सात सेकंद थांबून यंत्रातून व्हीव्हीपॅटमध्ये आपण मतदान केलेल्या उमेदवाराच्या निवडणूक चिन्हाचीच प्रिंट येते की नाही याची खात्री करून घेतली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnashik-pcनाशिक