शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

दलित वस्ती सुधार योजनेतील पाणीपुरवठयाची कामे प्राधान्यक्रमावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 18:11 IST

. समाजकल्याण विभागामार्फत वृद्ध कलावंत मानधन योजना राबविली जाते. या योजनेचा आढावा घेताांना प्रलंबित मानधन आणि मानधाचे प्रस्ताव तत्काळ निकाली काढण्याचे आदेश दिले. आंतरजातीय विवाह योजना व अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी वस्तीचा विकास करणे, तांडावस्ती अपंग बीज भांडवल, अपंग शिष्यवृत्ती, शालेय शिष्यवृत्ती योजनांचा योळी आढावा घेण्यात आला.

ठळक मुद्देसुनीता चारोसकर : समाजकल्याण सभेत अधिकाऱ्यांना सुचना

नाशिक: जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत राबविल्या जाणाºया विविध योजनांपैकी दलितवस्ती सुधार योजनांवर अधिक लक्ष केंद्रीत करून या योजनांमधील कामांची गुणवत्ता राखण्याबरोबरच दुष्काळी परिस्थितीचा विचार करता या ठिकाणी प्राधान्याने पाणीपुरवठा योजनांची कामे पुर्ण करण्यात यावीत अशा सुचना सभापती सुनीता चारोसकर यांनी दिल्या.जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समितीची सभा सभापती चारोस्कर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी त्यांनी समाजकल्याण विभागाकडून राबविण्यात येणाºया विविध योजनांची माहिती घेतली. अपुर्ण कामांचा तपशील आणि कामांना होणाºया विलंबाबतही त्यांनी आधिकाºयांना माहिती सादर करण्याचे आदेश दिले. समाजकल्याण विभागामार्फत वृद्ध कलावंत मानधन योजना राबविली जाते. या योजनेचा आढावा घेताांना प्रलंबित मानधन आणि मानधाचे प्रस्ताव तत्काळ निकाली काढण्याचे आदेश दिले. आंतरजातीय विवाह योजना व अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी वस्तीचा विकास करणे, तांडावस्ती अपंग बीज भांडवल, अपंग शिष्यवृत्ती, शालेय शिष्यवृत्ती योजनांचा योळी आढावा घेण्यात आला.दलितवस्ती सुधार योजनेंतर्गत एकुण ३६.११ कोटींचे ९१६ प्रस्ताव प्राप्त झालेले असून प्रस्तावांची छाननी झाल्यानंतर स्दर परिपुर्ण असलेल्या प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता देण्यात येणार आहे. सदर बैठकीमध्ये नाशिक जिल्ह्यात दुष्काळाचे सावट असल्याने दलित वस्ती सुधार योजनेत दुष्काळी परिस्थितीचा विचार करता पाणीपुरवठ्याच्या कामांना प्राधान्य देण्यात यावे असा निर्णय घेण्यात आला.दलितवस्ती सुधार योजनेंतंगर्त मंजूर असलेल्या कामांची गुणवत्ता व कामांची तपासणी होत नसल्यामुळे अनेक कामांच्या गुणवत्तेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे केलेल्या कामांचा लवकर बोजवारा उडतो आणि केलेल्या कामांचा लाभ देखील होत नाही. त्यामुळे समाजकल्याण विभागामार्फत होणाºया कामांचा दर्जा राखला जावा अशी सुचना चारोस्कर यांनी यावेळी केली. नाशिक तालुक्यातील गणेशगाव येथील रस्ता कॉँक्रीटीकरण करणे हे काम अतिशय निकृष्ठ दर्जाचे झाल्याची तक्रार हिरामण खोसकर यांनी केली. या कामांच्या चौकश्ीची मागणी त्यांनी केली.या बैठकीस हिरामण खोासकर, सुरेश कमानकर, यशवंत शिरसाठ, रमेश बरफ, कन्हू गायकवाड, विद्या पाटील, शोभा कडाळे उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिकnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद