शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

नाशिककरांना डेंग्यूचा डंख,  पंधरा दिवसांत ६२ जणांना लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 01:16 IST

शहरात आलेल्या महापुरानंतर अपेक्षेप्रमाणेच रोगराईने डोके वर काढले असून, आॅगस्टच्या पंधरा दिवसांतच तब्बल ६२ डेंग्यू रुग्ण आढळले आहेत, तर १७२ संशयित रुग्ण आढळले असून, त्यामुळे महापालिकेचे धाबे दणाणले आहे.

नाशिक : शहरात आलेल्या महापुरानंतर अपेक्षेप्रमाणेच रोगराईने डोके वर काढले असून, आॅगस्टच्या पंधरा दिवसांतच तब्बल ६२ डेंग्यू रुग्ण आढळले आहेत, तर १७२ संशयित रुग्ण आढळले असून, त्यामुळे महापालिकेचे धाबे दणाणले आहे.नाशिकमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा डेंग्यूचे रुग्ण कमी असले तरी ही संख्या आता आणखीनच वाढण्याची शक्यता आहे. गेल्या जुलै महिन्यात शहरात डेंग्यूचे ४८ रुग्ण आढळले होते. त्यानंतर जुलैअखेरीस संततधार पाऊस झाला, तर ४ आॅगस्ट रोजी अतिवृष्टी झाली. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने गोदावरीला महापूर आला. पूर ओसरतानाच आता रोगराईचे कडवे आव्हान असेल अशी शक्यता वर्तवली जात होती. त्यादृष्टीने महापालिकेत महापौर रंजना भानसी यांनी बैठकदेखील घेतली होती. परंतु उपाययोजना करूनही डेंग्यूचे डास वाढले असून, रोगराई सुरू झाली आहे. आॅगस्ट महिन्याच्या पंधरवाड्यात ६२ डेंग्यू पॉझिटिव्ह असलेले रुग्ण आढळले असून, १७२ संशयित रुग्ण आहेत. जानेवारीपासून आत्तापर्यंत १२२ पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. सुदैवाने डेंग्यूमुळे कोणाचा बळी गेलेला नाही.मनपाकडून आताही घरभेटी सुरू असून, पेस्ट कंट्रोलचे काम वाढविण्यात आले आहे. ज्या भागातून डास वाढल्याची तक्रार येते त्याठिकाणी पेस्ट कंट्रोल कर्मचाऱ्यांचे पथकच हजर होत आहेत.स्वाइन फ्लूचेदेखील आॅगस्टच्या पहिल्या पंधरवड्यात पाच रुग्ण आढळले आहेत. या रोगाच्या संसर्गाने जानेवारीपासून आत्तापर्यंत १६३ जणांना लागण झाल असून, दहा जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता खºया अर्थाने महापालिकेसमोर आव्हान उभे ठाकले आहे.

टॅग्स :dengueडेंग्यूHealthआरोग्य