शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

इंदिरानगरमधील फर्निचर दुकानास आग : लाखोंचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 23:33 IST

नाशिक : वडाळा - पाथर्डी रस्त्यावरील सिमेन्स कॉलनी परिसरातील पत्र्याच्या शेडमध्ये असलेल्या रंग, फर्निचर व प्लॅस्टिकच्या दुकानास शुक्रवारी (दि़६) सायंकाळच्या सुमारास आग लागली़ वेल्ंिडगच्या कामामुळे शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे असून या आगीमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे़ दरम्यान, अग्निशामक दल उशिरा पोहोचल्याने आग भडकल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे़सिमेन्स ...

ठळक मुद्देआगीमध्ये लाखो रुपयांचे नुकसानवाहतुकीस अडथळा

नाशिक : वडाळा - पाथर्डी रस्त्यावरील सिमेन्स कॉलनी परिसरातील पत्र्याच्या शेडमध्ये असलेल्या रंग, फर्निचर व प्लॅस्टिकच्या दुकानास शुक्रवारी (दि़६) सायंकाळच्या सुमारास आग लागली़ वेल्ंिडगच्या कामामुळे शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे असून या आगीमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे़ दरम्यान, अग्निशामक दल उशिरा पोहोचल्याने आग भडकल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे़

सिमेन्स कॉलनीमधील एका पत्र्याच्या शेडमध्ये घरासाठी दिले जाणारे रंगाचे यमुना ट्रेडर्स, प्लायवूडचे भारत ट्रेडर्स व फर्निचरचे यमुना फर्निचर असे तीन दुकाने आहेत़ प्रत्यक्षदर्शीने सांगितल्यानुसार सायंकाळी या ठिकाणी सुरू असलेल्या वेल्डिंगच्या कामामुळे शॉर्टसर्किट होऊन आग लागली़ रंगाचे दुकान असल्याने आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले़ त्यालगतच असलेले प्लायवूड व फर्निचरच्या दुकानांनी पेट घेतला़ या दुकानांशेजारीच असलेल्या उमा रो-हाउसमधील आठ कुटुंबीयांना नगरसेवक श्याम बडोदे व त्यांच्या सहकाºयांनी बाहेर काढले व त्वरित अग्निशमन दलास फोन करून आगीच्या घटनेची माहिती दिली़

सिडकोतील अग्निशमन विभागाचा बंब घटनास्थळी प्रथम दाखल झाला मात्र दुसरा बंब येण्यासाठी तब्बल पाऊण तास प्रतीक्षा करावी लागली व या कालावधीत आगीने रौद्ररूप धारण केले व यामध्ये लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला होता़ सुमारे आठ बंबांच्या साहाय्याने ही आग विझविण्यात आली़ दरम्यान बघ्यांच्या गर्दीमुळे आग विझविण्यास व वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता़