शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

तीन प्रवासी नियम लागू होताच रिक्षाभाडेवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 17:00 IST

भगूर : रिक्षामध्ये तीनच प्रवासी बसविण्याच्या निर्णयामुळे रिक्षाचालकांनी प्रवासी भाड्यात वाढ केली असून, त्यानुसार भगूर ते नाशिकरोड रिक्षाचे प्रवासी ...

ठळक मुद्देदहा रुपयांची वाढ : प्रवासी वर्गात मात्र नाराजी

भगूर : रिक्षामध्ये तीनच प्रवासी बसविण्याच्या निर्णयामुळे रिक्षाचालकांनी प्रवासी भाड्यात वाढ केली असून, त्यानुसार भगूर ते नाशिकरोड रिक्षाचे प्रवासी भाडे आता तीस रुपये इतके झाले आहे. या भाडेवाढीमुळे प्रवासी वर्गात नाराजी असताना चालकांनी मात्र पोलिसांच्या नियमावर खापर फोडले आहे. भाडेवाढ प्रवाशांना परवडत नसल्याचे काही रिक्षाचालकांचे म्हणणे असले तरी त्याशिवाय पर्याय नसल्याचेही म्हटले आहे.भगूर बसस्थानक ते नाशिकरोड बिटको प्रवासादरम्यान रिक्षाचालकांनी सध्याच्या वीस रुपये भाडे दरात दहा रु पये वाढ केली आहे. त्याप्रमाणेच भगूर देवळाली कॅम्पपर्यंत पाच रु पयांची भाडेवाढ केल्याने प्रवासी वर्गात तीव्र नाराजी पसरली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भगूर ते बिटको वीस रु पये इतकेच भाडे होते. बसलादेखील तितकेच तिकीट पडत असल्याने प्रवासी बसची वाट न पाहता थेट रिक्षाचा प्रवास करीत होते. शिवाय पूर्णांकात भाडे असल्याने सुट्टे पैशांची अडचणी येत नव्हती. त्यामुळे प्रतिसाद चांगला होता.त्याबरोबरच भगूर ते देवळाली कॅम्प १० रु पये प्रतिसीट याप्रमाणे असे रिक्षाभाडे होते. आता तेथेही वाढ करण्यात आलेली आहे. गेल्या ८ जून रोजी पोलिसांनी रिक्षाचालकांची बैठक घेऊन रिक्षात फक्त तीनच प्रवासी घेऊन वाहतूक करण्याचा सक्त आदेश दिल्याने रिक्षाचालकांना व्यवसाय करणे कठीण झाले आहे. त्यामुळे रिक्षाचालकांनी ८ जूनपासून भगूर ते देवळाली कॅम्प १५ रुपये, भगूर ते बिटको ३० रु पये, भगूर ते देवळाली रेल्वेस्टेशन २० रु पये रिक्षाभाडे घेण्यास सुरु वात केली आहे.

टॅग्स :NashikनाशिकPublic Transportसार्वजनिक वाहतूक