शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

धडधड वाढते ‘लसीकरणात’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 17:34 IST

गोवर-रुबेला लसीकरण मोहिम २०१८-१९ राज्यभर राबविली जात आहे. इतर जिल्ह्याच्या तुलनेत नाशिक जिल्ह्यात ९० टक्के लसीकरण झाल्यामुळे जिल्ह्याची आरोग्य ...

ठळक मुद्देविश्लेषण

गोवर-रुबेला लसीकरण मोहिम २०१८-१९ राज्यभर राबविली जात आहे. इतर जिल्ह्याच्या तुलनेत नाशिक जिल्ह्यात ९० टक्के लसीकरण झाल्यामुळे जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा आपलीच पाठ थोपटून घेताना दिसते. शंभर टक्केकडे वाटचाल करताना यंत्रणेचा या कामात हुरूप वाढणेही स्वाभाविकच. परंतु लसीकरणाची टक्केवारी एकीकडे वाढत असताना पालकांमध्ये लसीकरणाबाबत असलेली धडधड थांबलेली नाही हेही यंत्रणेला विसरून चालणार नाही. मात्र जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून वारंवार याबाबतीत पालकांनाच दोष दिला जात असेल तर यंत्रणेने आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता नक्कीच आहे. लसीकरणानंतर काही बालकांना त्रास झाल्याचे आणि काहींना रिअ‍ॅक्शन आल्याची प्रकरणे काही खोटी नाहीत. जिल्ह्यातही असे प्रकार घडलेले आहे. इतकेच नव्हे तर येवला तालुक्यातील अंदरसूल येथे एका बालिकेचा मृत्यू झाल्याचा आरोपही झाला. असे असतानाही जर आरोग्य विभाग पालक आणि बालकांनाच दोष देणार असेल तर मोहिमेतील हा स्वार्थीपणाच म्हटला पाहिजे. ज्या बालकांसाठी ही मोहीम आहे त्यांना कोणतीही वैद्यकीय अडचण उद्भवू नये म्हणून दक्षता घेतली जाते असे सांगितले जात असेल तर त्याचाही ढोल बडविण्याचे कारण नाही. आरोग्य यंत्रणेची ही जबाबदारीच आहे. मुद्दा आहे तो पालक आणि बालकांमधील भीती दूर करण्याचा. पालकांच्या मनात या लसीकरणाबाबत शंका असल्याचे वास्तव असतांना सरसकट बालकांचे लसीकरण करणे संयुक्तिक वाटत नाही. असे करण्यापूर्वी वैद्यकीय पूर्वइतिहास असलेल्या बालकांची माहिती मिळविणे अपेक्षित होते असे वाटते. मात्र आरोग्य आणि शिक्षणखात्याने याबाबतचे गांभीर्य दाखविलेले नाही. सर्वबालकांची शारीरिक, मानसिक आणि वैद्यकीय पार्श्वभूमीसारखी नसते हे कुणीही मान्य करेल. त्यामुळेच पालक आपल्या बाळाला लसीकरण करावे की नाही, अशा द्विधा मन:स्थितीत असतील तर त्यांची मानसिकता समजावून घेणेही महत्वाचे ठरते. तसे न झाल्याने लसीकरणाचे विपरित परिणाम समोर आले आणि आरोग्य विभागाकडे बोट दाखविले गेले. अशाही परिस्थितीत लसीकरणाची टक्केवारी वाढली असेल तर ती लसीकरणाच्या सक्तीमुळे आणि याच सक्तीमुळे पालकांच्याही मनातील धडधड वाढली आहे हेही नाकारून चालणार नाही.

 

टॅग्स :NashikनाशिकMedicalवैद्यकीय