शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मतदारांसाठीही ईव्हीएम, व्हीव्हीपॅटची रंगीत तालीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 15:38 IST

मतदानप्रक्रियेत वापरण्यात येणारे ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्रणांची कार्यपद्धती जवळून बघण्याची संधी मतदारांना मिळावी आणि शंकेचे निरसन व्हावे यासाठी जिल्हा ...

मतदानप्रक्रियेत वापरण्यात येणारे ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्रणांची कार्यपद्धती जवळून बघण्याची संधी मतदारांना मिळावी आणि शंकेचे निरसन व्हावे यासाठी जिल्हा निवडणूक शाखेने जिल्हाभर या यंत्रणाची माहिती देण्याची मोहिम पुन्हा एकदा सुरू केली आहे. गावावागात जाऊन मतदारांना ईव्हीएमची माहिती दिली जात आहे. या मोहिमेचा शुभारंभ मंगळवारी विभागीय आयुक्त राजाराम माने आणि जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या हस्ते करण्यात आला.जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघांसाठी केव्हाही निवडणुकीची घोषणा होऊ शकते, अशी शक्यता गृहीत धरून जिल्हा निवडणूक विभागाने सुरू केलेल्या निवडणुकीच्या तयारीला चांगलाच वेग आला आहे. जिल्ह्याची अंतिम मतदारयादी जाहीर करण्यात आली असून, यंत्रांच्या पडताळणी कामाला वेग आलेला आहे. जवळपास २१ हजार मतदान यंत्रांची पडताळणी पूर्ण करण्यात आलेली आहे.आता मतदानयंत्राची माहिती मतदरांपर्यंत पोहचविली जात असून यासाठी विशेष वाहन देखील तयार करण्यात आले आहे.गावागावात जाऊन मतदारांना यंत्रांची ओळख करून दिली जात असून प्रत्यक्ष केलेले मतदान आणि मशीनवर उमटणारे मतदान याचे प्रात्याक्षिक दाखविले जात आहे शिवाय झालेले मतदान आणि मतमोजणी यांचे देखील प्रात्याक्षिक करून दाखविले जात आहे. मतदारांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याचे काम या मोहिमेतून केले जात आहे.निवडणुकीसाठी ३ हजार ७५५ मतदान यंत्रे नाशिकसाठी प्राप्त झाली आहेत. ही यंत्रे अंबड येथील वेअरहाउसमध्ये ठेवण्यात आली असून, या ठिकाणी सदर मतदान यंत्रांची तांत्रिक तपासणी करण्यात आली. े. मतदानासाठी राज्यात मोठ्या संख्येने व्हीव्हीपॅट, कंट्रोल युनिट, ईव्हीएम ही यंत्रे लागणार आहेत. त्यासाठी निवडणूक आयोगाकडून उत्तर प्रदेश, तामिळनाडू, पुणे व बंगळुरू येथील बेल कंपनीकडून यंत्रे उपलब्ध करून दिली आहेत. नाशिकला बंगळुरू येथील बेल कंपनीकडून यंत्रे मिळाली आहेत.

टॅग्स :NashikनाशिकElectionनिवडणूक