शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

सुटीच्या दिवशीही कर्मचारी निवडणुकीच्या कामाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 15:53 IST

नाशिक : लोकसभा निवडणुकीनंतर लागलीच विधानसभा निवडणुकीची तयारी करणाऱ्या निवडणूक शाखेने अधिकारी, कर्मचाऱ्यांवर सोपविलेल्या जबाबदारीनुसार सुटीच्या दिवशीही कर्मचारी निवडणुकीच्या ...

ठळक मुद्देतयारी विधानसभेची : अंबड येथील गुदामात मशीनची जुळवाजुळव

नाशिक : लोकसभा निवडणुकीनंतर लागलीच विधानसभा निवडणुकीची तयारी करणाऱ्या निवडणूक शाखेने अधिकारी, कर्मचाऱ्यांवर सोपविलेल्या जबाबदारीनुसार सुटीच्या दिवशीही कर्मचारी निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. सलग सुट्ट्या असताना कर्मचारी निवडणूकपूर्व कामात व्यस्त होते.आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा निवडणूक शाखेकडून निवडणुकीची जोरदार पूर्वतयारी सुरू आहे. जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीसाठी आयोगाकडे करण्यात आलेल्या मागणीनुसार जिल्ह्यासाठी मतदान यंत्रे तसेच व्हीव्हीपॅट मशीन्स दाखल झालेल्या असून, अंबड येथील सेंट्रल वेअरहाउस येथे मतदान यंत्रे ठेवण्यात आलेली आहेत. निवडणूक कामाची जबाबदारी असलेले अधिकारी आणि कर्मचारी गेल्या दोन दिवसांपासून येथे निवडणूकपूर्व कामाला लागले आहेत.विधानसभा निवडणूक पारदर्शक आणि विनातक्रार होण्यासाठी राबविण्यात आलेले उपक्रम, मतदान कर्मचाºयांची तत्परता या जोरावर नाशिक जिल्ह्याने निवडणुकीच्या कामात आघाडी घेतली आहे. राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदविण्यात आलेल्या मागणीनुसार जिल्ह्यासाठी दहा हजार बॅलेट युनिट, सहा हजार व्हीव्हीपॅट व सहा हजार कंट्रोल युनिटची काही यंत्रे दाखल झाली आहेत. या यंत्रणांसाठी लागणाºया पूरक साहित्यांची जमवाजमवदेखील करण्यात आलेली आहे. अंबड येथे सध्या या यंत्रांसंदर्भात कर्मचाºयांना काही सूचना आणि मार्गदर्शन केले जात आहे.

टॅग्स :NashikनाशिकElectionनिवडणूक