शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक कोंडीमुळे पुणे मार्गावरील बसेस विलंबाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 17:42 IST

नाशिक : रविवारी पहाटे तीन वाजेपासून खेड घाटात बंद पडलेल्या ट्रकमुळे पुणे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याने पुण्याकडे जाणाऱ्या-येणाºया बसेसचे ...

ठळक मुद्देघाटात ट्रक अडकला : सात तास वाहतूक विस्कळीत

नाशिक : रविवारी पहाटे तीन वाजेपासून खेड घाटात बंद पडलेल्या ट्रकमुळे पुणे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याने पुण्याकडे जाणाऱ्या-येणाºया बसेसचे नियोजन कोलमडले आहे. स्थानकातून बसेस नियोजित वेळेत सोडण्यात आल्या असल्या तरी नारायणगाव ते खेड दरम्यान वाहनांच्या रांगा लागल्याने वाहतूक कोंडीत बसेस अडकून पडल्या होत्या. एका बाजूने अत्यंत संथ वाहने सोडण्यात येत असल्याने दुपारी १ वाजता वाहतूक काही प्रमाणात सुरू झाल्याचे प्रत्यक्षदर्शिंनी सांगितले.नाशिकहून दररोज पुणे येथे शिवशाही, एशियाड आणि साध्या बसेस गाड्या धावतात. सुमारे दर अर्ध्या तासाने नाशिकहून पुण्याकडे आणि पुण्याहून नाशिकला बसेसची वाहतूक सुरू असते. त्याचप्रमाणे अन्य डेपोंच्या दोन्ही शहरांमध्ये येणाºया बसेसदेखील आहेत. रविवारी या सर्व गाड्यांना पुण्याला पोहोचण्याला आणि नाशिकला येणाºया गाड्यांनाही विलंब झाला. खेड घाटात रविवारी पहाटे बंद पडलेला ट्रक सोडून ड्रायव्हर निघून गेल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.रस्त्याच्या मध्येच ट्रक बंद पडल्याने येणाºया-जाणाºया वाहनांच्या चालकांनी मार्ग काढण्याचा प्रयत्न केल्याने समोरासमोर आलेल्या वाहनांमुळे कोंडीत अधिकच भर पडली. एका बाजूला बंद पडलेला ट्रक, दुसºया बाजूला घाट आणि समोर तसेच मागेही वाहनांची रांग लागल्याने जागेवरून गाडी काढणेही कठीण झाले होते. त्यामुळे अधिकच गोंधळ उडून वाहतूक कोंडी वाढतच गेली. पहाटेची वेळ असल्यामुळे आणि चालक जागेवर नसल्याची बाब बराच वेळानंतर लक्षात आल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र ट्रक जागेवरून काढण्याचा मोठा प्रश्न होता.

टॅग्स :NashikनाशिकPoliticsराजकारण