शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
3
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
4
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
5
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
6
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
7
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
8
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
9
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
10
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
11
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
12
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
13
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
14
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
15
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
16
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
17
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
18
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
19
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
20
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?

गोवर लसीकरणात जिल्हा अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 17:09 IST

नाशिक : नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या गोवर, रुबेला लसीकरणात जिल्ह्यातील कामगिरी ९४ टक्के इतकी सर्वोत्कृष्ट राहिल्याने जिल्ह्याने विभागात सर्वोत्कृष्ट ...

ठळक मुद्देजिल्हा परिषद : उर्वरित लसीकरणाला प्राधान्य

नाशिक : नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या गोवर, रुबेला लसीकरणात जिल्ह्यातील कामगिरी ९४ टक्के इतकी सर्वोत्कृष्ट राहिल्याने जिल्ह्याने विभागात सर्वोत्कृष्ट कामगिरीची नोंद केली आहे. महापालिका हद्दीमध्ये अपेक्षित काम अद्यापही झाले नसल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. जिल्ह्यात आत्तापर्यंत १० लक्ष ७४ हजार ३९८ मुलामुलींचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे.नाशिक जिल्ह्यात मोठा प्रमाणावर गोवर, रुबेला लसीकरणाची मोहीम सुरू असून, प्रत्येक शाळांमध्ये लसीकरणाची जागरूकता करण्यात आल्याने लसीकरणाला वेग आला आहे. नाशिक जिल्ह्यात ११,३९,५४९ लाभार्थी आहेत. असून आत्तापर्यंत १०,७४,३९८ मुलामुलींचे लसीकरण करण्यातं ाले आहे. लसीकरणाची दैनंदिन आकडेवारी ही वाढती असल्याने निर्धारित वेळेत जिल्ह्याने ९४ टक्केपर्यंत लसीकरणाची मजल मारली आहे. वयवर्षे नऊ महिने ते सहा वर्षे वयोगटातील सर्व बालकांना या मोहिमेत लसीकरण केले जात आहे.या मोहिमेसाठी आरोग्य विभागाच्या उपसंचालक डॉ. रत्ना रावखंडे तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय डेकाटे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. रवींद्र चौधरी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे हे नियमित जिल्ह्यामध्ये नगरपालिका, उपकेंद्र, शाळा, येथील लसीकरणाला भेटी देत असून, कार्यक्र माची नियमित तळ पडताळणी करण्यात येत आहे.लसीकरणाबाबत असलेल्या अनेक गैरसमजातून प्रारंभ लसीकरणाला अनेक अडचणी आल्या, परंतु त्यानंतर झालेल्या व्यापक जनजागृतीमुळे मोहिमेला गती प्राप्त झाली आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यामध्ये कोणत्याही प्रकारची लसीकरण यामधील गुंतागुंत आढळून आलेली नाही शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक, संस्थाचालक यांचे या मोहिमेला पाठबळ मिळाल्याने मोहिमेला गती आली आहे.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका