शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक जिल्हा मजूरसंघाची निवडणूक बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 22:08 IST

नाशिक जिल्हा मजूर संस्था सहकारी संघाची निवडणूक बिनविरोध होऊन अध्यक्षपदी शिवाजी कासव, तर उपाध्यक्षपदी प्रमोद भाबड यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

ठळक मुद्देअध्यक्षपदी शिवाजी कासव; उपाध्यक्षपदी प्रमोद भाबडचिंतामण गावित यांचा राजीनामा

नाशिक : नाशिक जिल्हा मजूर संस्था सहकारी संघाची निवडणूक बिनविरोध होऊन अध्यक्षपदी शिवाजी कासव, तर उपाध्यक्षपदी प्रमोद भाबड यांची बिनविरोध निवड करण्यात आली.नाशिक जिल्हा संघाचे अध्यक्ष  सतीश सोमवंशी व उपाध्यक्ष जगन्नाथ वाजे यांनी राजीनामा दिल्याने या दोन्ही पदासाठी निवडणूक घेण्यात आली. जिल्हा मजूर संघाच्या कार्यालयात निवडणूक घेण्यात आली. अध्यक्षपदासाठी शिवाजी कासव यांच्या नावाची सूचना संपत सकाळे यांनी मांडली. त्यास योगेश हिरे यांनी अनुमोदन दिले. कावस यांचा या पदासाठी एकमेव अर्ज आल्याने त्यांनी बिनविरोध निवड झाली, तर उपाध्यक्षपदासाठी प्रमोद भाबड यांच्या नावाची सूचना विठ्ठल वाजे यांनी मांडली त्यास नीलेश अहेर यांनी अनुमोदन दिले. त्यांचाही एकमेव अर्ज आल्याने त्यांचीही बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपनिबंधक अर्चना सैंदाणे यांनी काम पाहिले.यावेळी संघाचे सर्व संचालक उपस्थित होते. यावेळी नवनिवयुक्त अध्यक्ष, उपाध्यक्षांचा संचालक मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. जिल्ह्यातील प्राथमिक मजूर सहकारी सस्थाच्या हितासाठी अडीअडचणी सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे शासनाकडे मागण्यांचा पाठपुरावा केला जाईल, असे अध्यक्ष कासव यांनी यावेळी सांगितले.--इन्फो--चिंतामण गावित यांचा राजीनामानाशिक जिल्हा मजूर संस्था सहकारी संस्थेचे संचालक सुरगाणा येथील चिंतामण जाणू गावित यांनी आपल्या संचालकपदाचा राजीनामा यावेळी जाहीर केला. सुरगाणा तालुका संचालक गावित यांनी प्रकृतीच्या कारणास्तव आपण राजीमाना देत असल्याचे राजीनामा पत्रात म्हटले आहे. गावित यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे राजीनामा सादर केला आहे.

टॅग्स :NashikनाशिकElectionनिवडणूक