शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
2
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
3
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
4
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
5
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
6
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
7
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
8
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
9
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...
10
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
11
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
12
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
13
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
14
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
15
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
16
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
17
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
18
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
19
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
20
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार

जॉगिंग ट्रॅकचा भटक्या श्वानाचा ताबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 19:13 IST

नाशिक : स्वर्गीय मीनाताई ठाकरे क्रीडा संकुल लगत मनपा प्रशासनाने नागरिकांसाठी तयार केलेल्या जॉगिंग ट्रॅकवर गेल्या काही दिवसांपासून मोकाट ...

ठळक मुद्देफिरणे मुश्किल : अंगावर धावून जाण्याचे प्रकार

नाशिक : स्वर्गीय मीनाताई ठाकरे क्रीडा संकुल लगत मनपा प्रशासनाने नागरिकांसाठी तयार केलेल्या जॉगिंग ट्रॅकवर गेल्या काही दिवसांपासून मोकाट श्वानाचा  उपद्रव वाढल्याने सकाळी फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. महापालिकेने या मोकाट श्वानचा  बंदोबस्त करावा, अशी मागणी जॉगर्सने केली आहे.हिरावाडीत पाण्याच्या पाटाला लागून महापालिकेने तयार केलेल्या जॉगिंग ट्रॅकवर सकाळच्या सुमारास युवक, नागरिक तसेच ज्येष्ठ नागरिक फिरण्यासाठी येत असतात. याच ट्रॅकवर पंधरा ते वीस मोकाट श्वान बसलेले असतात. सकाळी नागरिक ट्रॅकवर येत असले तरी या ठिकाणी विद्युत व्यवस्था नसल्याने नागरिकांना अंधारात मार्गक्रमण करावे लागते. ट्रॅकवर बसलेले कुत्रे फिरणाºया नागरिकांच्या अंगावर धावून जात असल्याने या कुत्र्यांची नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. दिवसभर ट्रॅकचा ताबा घेतलेले हे मोकाट श्वान ट्रॅकची माती उखडून खड्डे करत असल्याने या खड्ड्यात तोल जाऊन नागरिकांच्या पायाला दुखापत होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. मोकाट कुत्र्यामुळे नागरिकांना सकाळी स्वसंरणार्थ फिरताना हातात दगड किंवा काठ्या घेऊन ये-जा करावी लागत असल्याचे चित्र दिसून येते. लाखो रुपये खर्च करून तयार केलेल्या अद्ययावत ट्रॅकवर गेल्या काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांनी ताबा घेतल्याने महापालिका प्रशासनातर्फे वेळीच श्वानचा  बंदोबस्त करावा, अशी मागणी ट्रॅकवर फिरण्यासाठी येणाºया नागरिकांनी केली आहे.

 

टॅग्स :Nashikनाशिकdogकुत्रा