शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी गीते रजेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 20:15 IST

जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी नरेंद्र गीते यांनी मंगळवारी पदभार स्विकारल्यानंतर बुधवारपासून ते पंधरा दिवसांच्या प्रदिर्घ रजेवर निघून गेले आहेत.

ठळक मुद्दे गीते हे रजेवर गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पुढील महिन्यांपासूनच येणार कामकाजला गती

नाशिक : जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी नरेंद्र गीते यांनी मंगळवारी पदभार स्विकारल्यानंतर बुधवारपासून ते पंधरा दिवसांच्या प्रदिर्घ रजेवर निघून गेले आहेत. वादग्रस्त मुख्य कार्यकारी अधिकारी दिपककुमार मिणा यांच्या कार्यकाळात मंदावलेल्या कामांना आता गती मिळेल असे वाटत असतांनाच गीते हे रजेवर गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प तोंडावर असतांना गीते रजेवर गेले आहेत.  वादग्रस्त  दिपककुमार मिणा यांची मुख्यमंत्र्यांनी अचानक उचलबांगडी केल्यानंतर त्यांच्या जागी मिरा-भार्इंदरचे आयुक्त नरेश गीते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्ती आदेशाच्या दुसऱ्याच  दिवशी गीते यांनी नाशिकमध्ये येऊन मिणा यांच्याकडून पदभार स्विकारला होता. यावेळी त्यांनी सदस्य, सभापती यांच्या समन्वयातून यापुढील काळात कामकाज केले जाईल असे स्पष्ट करून विकासात्मक कामांवर भर देण्याचे सांगितले होते. मात्र पदभार घेतल्यानंतर दुसऱ्याच  दिवसांपासून ते पंधरा दिवसांच्या रजेवर निघून गेले आहेत. त्यांच्या रजेचे अद्याप कारण समजू शकले नाही.जिल्हा परिषदेचे संपुर्ण कामकाज ठप्प झालेले असतांना आणि जिल्हा परिषद सदस्यांकडून कामाचा तगादा सुरू असतांनाच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी  मात्र सुटी घेतल्याने जिल्हा परिषदेला स्थिरस्थावर होण्याच आणखी विलंब होणार आहे. आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी अनेक कामे मार्गी लावणे अपेक्षित असतांना आणि आगामी अर्थसंकल्प तोंडावर असतांना जिल्हा परिषदेची अनेक कामे मार्गी लावण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची वाट पाहावी लागणार आहे.आपल्या कार्यपद्धतीने वादग्रस्त ठरलेले दिपककुमार मिणा यांच्या कार्यकाळातील प्रलंबित फाईल्सचा निपटारा करण्यासाठी अधिकाऱ्यांशी समन्वयातून कामकाज करून मार्ग काढला जाईल असे नियोजन आखणाऱ्या  गीते यांनीच अचानक सुटी घेतल्याने अधिकारही संभ्रमात पडले आहेत. येत्या २२ तारखेपर्यंत गीते रजेवर असून पुढील महिन्यांपासूनच खऱ्या  अर्थाने जिल्हा परिषदेच्या कामकाजला गती प्राप्त होऊ शकणार आहे.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदNashikनाशिक