शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या आता आॅनलाइन बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 17:37 IST

नाशिक : जिल्हा परिषदेच्या गट वर्ग ३ व ४ संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्या करण्यासाठी जिल्हा परिषदेने आॅनलाइन सॉफ्टवेअर तयार ...

ठळक मुद्दे सॉफ्टवेअर तयार : वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी नियोजन

नाशिक : जिल्हा परिषदेच्या गट वर्ग ३ व ४ संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्या करण्यासाठी जिल्हा परिषदेने आॅनलाइन सॉफ्टवेअर तयार केले असून, सन २०१९ च्या वर्ग ३ व ४ मधील कर्मचाऱ्यांच्या बदल्या आॅनलाइन पद्धतीने करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिली.शासनाने जिल्हा परिषदेच्या गट क संवर्गातील कर्मचाºयांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबत धोरण निश्चित केलेले आहे. त्यानुसार दरवर्षी समुपदेशनाने आॅफलाइन पद्धतीने बदल्यांची कार्यवाही करण्यात येते. समुपदेशनाने आॅफलाइन पद्धतीने बदल्या करण्याच्या प्रक्रि येत वेळेचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होतो. बदलीप्रक्रि या पारदर्शी, सुकर व वेळेचा होणारा अपव्यय टाळण्यासाठी नाशिक जिल्हा परिषदेने आॅनलाइन सॉफ्टवेअर तयार केले असून, त्यामध्ये सर्व कर्मचाºयांची माहिती भरण्यात आलेली आहे.शासन निर्णयानुसार काही बाबींच्या अनुषंगाने कर्मचारी बदल्यांमधून सूट मिळवितात किंवा विनंती व प्रशासकीय बदलीचा लाभ घेतात. अशा कर्मचाºयांनी आॅनलाइन बदलीची माहिती भरताना याबाबतचा पुरावा अपलोड करणे आवश्यक असून याबाबतच्या लेखी सूचना सर्व खातेप्रमुख व गटविकास अधिकाºयांना देण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने पती-पत्नी एकत्रीकरण असल्यास सक्षम प्राधिकरणाचा दाखला, विविध प्रकारचे आजार असलेले, अपंग, मतिमंद व अपंग मुलांचे पालक यांनी जिल्हा शल्यचिकित्सकाचे किंवा सक्षम प्राधिकरणाचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.

टॅग्स :Nashikनाशिकnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद