शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

चार लाख भरून जिल्हा परिषदेने  मिळविली खुर्ची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 16:16 IST

नाशिक : जमीन संपादनाचा शेतकऱ्यांना  पुरेसा मोबदला देण्यास टाळाटाळ करणाऱ्या  अभियंत्याची खुर्ची जप्त केल्यानंतर दोनच दिवसांनी जिल्हा परिषदेने चार लाख रुपये  भरून खुर्ची परत मिळविली. मागील आठवड्यात न्यायालयाच्या आदेशान्वये संबंधित खात्याची खुर्ची आणि दोन संगणक जप्त करण्यात आले होते.

ठळक मुद्दे जिल्हा परिषदेने न्यायालयात भरली रक्कम वाढीव मोबदला मिळण्यासाठी न्यायालयात धाव

जिल्हा परिषद : न्यायालयात भरली रक्कमनाशिक : जमीन संपादनाचा शेतकऱ्यांना  पुरेसा मोबदला देण्यास टाळाटाळ करणाऱ्या  अभियंत्याची खुर्ची जप्त केल्यानंतर दोनच दिवसांनी जिल्हा परिषदेने चार लाख रुपये  भरून खुर्ची परत मिळविली. मागील आठवड्यात न्यायालयाच्या आदेशान्वये संबंधित खात्याची खुर्ची आणि दोन संगणक जप्त करण्यात आले होते.दिंडोरी तालुक्यातील मौजे साद्राळ येथील शेतकऱ्यांना  जमीन संपादनाचा पुरेसा मोबदला न दिल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशान्वये जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांची खुर्ची गेल्या २ तारखेला जप्त करण्यात आली होती. १९९६ मध्ये सुमारे १४ शेतकऱ्याची शेतजमीन पाझरतलावासाठी संपादित करण्यात आली होती. या शेतकऱ्यांना बाजारमूल्यप्रमाणे मोबदला न मिळाल्याने त्यांनी वाढीव मोबदला मिळण्यासाठी वारंवार लघुपाटबंधारे विभागाकडे मागणी नोंदविली होती. मात्र संबंधित विभागाकडून केवळ आश्वासन दिले जात होते. शेतकऱ्यांच्या मागणीची कोणतीही दखल घेतली जात नव्हती. जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाच्या दिरंगाईमुळे आर्थिक कोंडी झालेले प्रकल्पग्रस्त शेतकरी गणपत हरी भुसारे, विष्णू धोंडीराम राऊत, यशवंत नारायण भुसारे, जगन्नाथ रंगनाथ भुसारे आदी सुमारे १४ शेतकऱ्यांनी अखेर न्यायालयात धाव घेऊन व्याजासह मोबदला मिळावा अशी याचिका दाखल केली होती.अखेर न्यायालयाने प्रकल्पग्रस्त गणपत भुसारे यांना मूळ रक्कम ८ लाख ९० हजार ५९८ रुपये तसेच व्याजाची रक्कमसह मोबदला अदा करण्याचे आणि रक्कम न दिल्यास खुर्ची आणि संगणक जप्त करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार संबंधित अभियंता यांची खुर्ची आणि कार्यालयातील दोन संगणक जप्त करण्यात आले होते. अखेर जिल्हा परिषदेने सुमारे चारलाख रूपये भरून खुर्ची आणि संगणक परत मिळविले आहे. आता उर्वरित शेतकऱ्यांना देखील न्यायाची अपेक्षा असून प्रकल्पग्रस्तांचे सुमारे ६६ लाखांच्या रकमेची तरतूद जिल्हा परिषदेने करावी अशी अपेक्षा संबंधित शेतकरी बाळगून आहेत.

टॅग्स :Nashikनाशिकnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद